Maharashtra News Live Update: मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

Marathi Breaking Live Headlines Updates : दिल्लीत सीजीपीचे आज तिरंगा मोर्चा, महाराष्ट्रात राजू शेट्टींचे आंदोलन, नवरात्रौउत्सव, १० जिल्ह्यात पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

मेगा ब्लॉकचा फटका मुंबई कडून कसाराकडे जाणाऱ्या लोकलवर

लोकल उशिरा असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा

मालेगावात पुन्हा टिपू सुलतान चर्चेत.समाजवादी पार्टीने काढलेल्या मोर्चात घोषणाबाजी

नाशिकच्या मालेगावात पुन्हा टिपू सुलतान चर्चेत आला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारच्या राजीनामासाठी मालेगावात करण्यात आलेल्या आंदोलनात टिपू सुलतानच्या घोषणाबाजी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनात टिपू सुलतानची घोषणाबाजी करण्यात आली. हमे चाहिये आजादी, टिपू वाली आजादी अशा घोषणांनी परीसर दणाणून गेला. त्यामुळे पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या घोषणाबाजी केल्याने मालेगावात टिपू सुलतान वाद चिघळण्याची होण्याची शक्यता आहे.

मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

मलंगगड ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज कल्याण पश्चिमेतील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या केबिनच्या लाईट बंद केल्या आणि मेणबत्ती पेटवून अंधारात अधिकाऱ्यांना जाब विचारला येत्या पंधरा दिवसात जर या समस्येवर तोडगा काढला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला याप्रसंगी शिवसेनेचे अंबरनाथ तालुकाप्रमुख चैनू जाधव आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात सुरू, तरी टँकरने BRT डिव्हायडर धुतले! नागरिकांचा संताप

पिंपरी-चिंचवड शहरात १० टक्के पाणीकपात लागू असताना काळेवाडी परिसरात पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. BRT मार्गाचे डिव्हायडर धुण्यासाठी पाण्याचे टँकर वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे नागरिक पाणीटंचाईच्या तक्रारी करत असताना दुसरीकडे पाण्याचा असा वापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पंढरपुरात रूक्मिणी मातेची कमलादेवी रूपात पूजा 

नवरात्रातील सहाव्या दिवशी रूक्मिणी मातेची कमलादेवीच्या रूपात पूजा करण्यात आली. या निमित्ताने माता रुक्मिणी मातेला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जळगावात तिरंगा रॅली; भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी 

जळगाव शहरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध पक्षांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधी उद्यानापर्यंत तिरंगा रॅली काढली.

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, अन्यथा राज्यात पुन्हा आंदोलन! रोहित पवारांचा सरकारला इशारा

दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना राज्य सरकारने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये, तर आगाऊ स्वरूपात ३० ते ३५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार; उदय सामंतांचा मोठ्या मताधिक्याने विजयाचा विश्वास 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून, अमरावतीत विजय संकल्प मेळावा पार पडला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मेळाव्याला खासदार, मंत्री, आमदार आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते

ललिता तारख यांची पंकजा मुंडे आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट; ट्रोलिंगविरोधात संरक्षणाची मागणी

मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय राहिलेल्या ललिता तारख यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. सोशल मीडियावर आपल्यासह कुटुंबीयांना ट्रोल केलं जात असून, AI च्या माध्यमातून फोटो तयार केल्याचा आरोप त्यांनी केला.

तिरंगा मार्चपूर्वी दिल्लीत घडामोडींना वेग; अभिजीत दिपके यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, समर्थकांची घोषणाबाजी

तिरंगा मार्चपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर दिपके यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी सुरू आहे.

आंदोलनापूर्वी अभिजित दिपकेंना पोलिसांनी अडवलं

आंदोलनापूर्वी अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिपके आज 'लहरा दो तिरंगा' ही रॅली काढणार आहेत

विदर्भात परतीच्या पावसाचा अंदाज; १८ ऑक्टोबरनंतर नागपूरसह काही भागांत पावसाची शक्यता

विदर्भात परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ऑक्टोबरनंतर नागपूरसह विदर्भातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परतीच्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा आणि नुकसान असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. काढणीला आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. तर कापूस, धान आणि संत्रा पिकांसाठी हा पाऊस काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार काढणी आणि शेतीकामांचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दारव्हा येथे काँग्रेसचा सरकारविरोधात मोर्चा; पाच हजारांची मदत मुख्यमंत्र्यांना पाठवून निषेध

शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावरून दारव्हा येथे काँग्रेसने सरकारविरोधात मोर्चा काढला. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अपुरी असल्याचा निषेध नोंदवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भीक मागून पाच हजार रुपये जमा केले.

जमा केलेली ही रक्कम उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

CJP च्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनावर दिल्ली पोलिसांची प्रतिक्रिया; कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

CJP च्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत आंदोलकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे (BNSS) कलम १६३ लागू करण्यात आले असून, त्याअंतर्गत काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्वांनी लागू असलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन दिल्ली पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या नोटिशीनंतर अभिजीत दिपके वकिलांशी चर्चा करणार

दिल्ली पोलिसांनी सेंट्रल पार्क येथे निदर्शने करण्यास मनाई केली असून, परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके पोलिसांच्या नोटिशीसंदर्भात वकिलांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेत आहेत. कायदेशीर सल्ल्यानंतरच ते पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

आनंद दुबे यांचा ठाकरे गटाला रामराम; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

आनंद दुबे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. अनेक वर्षे पक्षात काम करूनही योग्य वागणूक मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत आपण ठाकरे गट सोडत असल्याचे दुबे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुलढाण्यात पाणीटंचाईचे संकट गडद; ऑक्टोबरमध्येच ७५ पैकी ५४ पाझर तलाव आटले

बुलढाणा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट आतापासूनच गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील एकूण ७५ पाझर तलावांपैकी तब्बल ५४ तलाव ऑक्टोबर महिन्यातच आटल्याची माहिती समोर आली आहे. केळवदजवळील जो पाझर तलाव काही महिन्यांपूर्वी अर्ध्याहून अधिक भरलेला होता, तो अवघ्या दोन महिन्यांत कोरडा पडला आहे. पावसाचा खंड आणि वाढत्या उन्हाची तीव्रता यामुळे जलसाठ्यांवर मोठा परिणाम झाला आहे.

अजून उन्हाळा सुरू व्हायचा असतानाच पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. ऑक्टोबरमध्येच ७५ पैकी ५४ पाझर तलाव आटल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आणि उपलब्ध जलसाठ्यांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास आगामी काळात बुलढाणेकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

तुळजाभवानी देवीची सहाव्या माळेनिमित्त मुरली अलंकार महापूजा; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सहाव्या माळेनिमित्त आज देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. धार्मिक आख्यायिकेनुसार, देवीने महिषासुराशी युद्ध पुकारले असताना श्रीकृष्ण आणि देवीची भेट झाली. त्यावेळी श्रीकृष्णाने देवीला मुरली भेट दिली, अशी मान्यता आहे. त्यामुळे सहाव्या माळेला देवीची मुरली अलंकार पूजा मांडली जाते.

मुरलीधर रूपातील देवीने मुरलीवादनातून भयभीत देव-देवता आणि ऋषीमुनींना धीर दिला, तसेच त्यांच्या मनात आनंद आणि उत्साह निर्माण केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. या विशेष अलंकार पूजेतून देवीच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन भाविकांना घडले. दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवाच्या सलग सहाव्या दिवशीही तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मंत्री मंगल प्रभात लोढांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट; महाराष्ट्रातील नवोपक्रम आणि रोजगार उपक्रमांचे कौतुक

महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कौशल्य विकास आणि नाविन्यता विभागाशी संबंधित विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये महाराष्ट्रातून विक्रमी प्रवेश नोंदवण्यात आल्याबद्दल तसेच ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत रोजगारनिर्मितीच्या उपक्रमाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केल्याची माहिती देण्यात आली.

Mumbai: सचिन वाझेने केलेलं कृत्य हे दहशतवादी कृत्यच, कारण त्यात स्फोटकांचा वापर झाला: एनआयएचा दावा

मुंबई - सचिन वाझेने केलेलं कृत्य हे दहशतवादी कृत्यच कारण त्यात स्फोटकांचा वापर झाला एनआयएचा दावा

सचिन वाझेनेच जिलेटीन कांड्या ठेवल्या होत्या: एनआयए

यात कोणतही दहशतवादी कृत्य नसल्याचा आहे वाझेच्या वकिलांचा दावा

तसेच टेलिग्रामवर धमकी देण्यात आली होती

Pune: दिवाळीनिमित्त पुण्याहून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे सर्व बुकिंग फुल्ल

दिवाळीनिमित्त पुण्याहून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे सर्व बुकिंग फुल्ल

पुण्यातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेटिंग १९८ टक्क्यांवर

दोन महिने आधी बुकिंग सुरू झाल्यापासून आतापर्यंत उत्तर आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल

pune: पुणे महानगरपालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा तहकूब

पुणे महानगरपालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा तहकूब

आता 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे सर्वसाधारण सभा

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी सर्व नगरसेवकांच्या एक वर्षाचे मानधन दुष्काळग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत म्हणून द्यावे असा प्रस्ताव ठेवला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून एका महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तंना देण्याबाबतचा प्रस्ताव आम्ही दिला असल्याचे सांगितले.

सर्व नगरसेवकांची सहमती घेऊन अंतिम निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.

Pune: पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या 'लहरा दो तिरंगा' कार्यक्रमाचे आयोजन

पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या 'लहरा दो तिरंगा' कार्यक्रमाचे आयोजन

संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर “लहरा दो तिरंगा” कार्यक्रम होणार

या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली असल्याची सीजेपीची माहिती

Lonavala: लोणावळ्यात परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

लोणावळ्यात परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

२० आरोपींना पोलिसांनी केली अटक

आरोपींकडून ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar: नंदूरबारमध्ये यंदा हिवाळ्यातच भीषण पाणी टंचाई

नंदूरबारमध्ये यंदा हिवाळ्यातच भीषण पाणी टंचाई

जिल्ह्यातील 12 प्रकल्पांमध्ये आत्ताच खडखडाट

खरिपानंतर आता रब्बीच्या आशाही मावळल्या

भूगर्भातील पाणीपातळीत मोठी घट

Pune: पुण्यात दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेस नगरसेवक आमने सामने

पुण्यात दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेस नगरसेवक आमने सामने

भाजपने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीसाठी एक वर्षांचे मानधन देण्याच्या प्रस्ताव दिला आहे

यावर काँग्रेस नगरसेवकांनी आम्ही आमच्या गटनेत्यांच्या सुचनेनुसार देऊ या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

Mumbai: भाजप नगरसेविका प्रिती सातम यांचे मुंबई महापालिकेला पत्र

भाजप नगरसेविका प्रिती सातम यांचे मुंबई महापालिकेला पत्र

प्रखर उन्हात काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा धोका

वाढत्या तापमानामुळे कामगारांच्या आरोग्याच्या उपाययोजना करा

उष्माघातापासून कामगारांच्या संरक्षणासाठी ओआरएस पावडरचे वाटप करा

प्रिती सातम यांची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

Nandurbar: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

नंदुरबारमध्ये वसतीगृहांच्या समस्येसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

अक्कलकुवा ते तळोदा लाँग मार्च करत विद्यार्थ्यांचा तळोदा प्रकल्प कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

तळोदा प्रकल्प कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरूच

Pune: एकीकडे दुष्काळाचं सावट, दुसरीकडे डिंभे धरणातून प्रतिसेकंद १८०० लिटर पाण्याची गळती

राज्यात पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना, पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. धरणाच्या भिंतीतून प्रतिसेकंद १८०० लिटर पाणी गळत असल्याचा दावा करण्यात येत असून, भिंतीवर वाढलेल्या झाडांमुळे धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक

अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

राज्यभरात ‘आपले सरकार’ पोर्टलसह ऑनलाइन सेवा २१ ऑक्टोबरपर्यंत बंद

राज्यभरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलसह विविध शासकीय ऑनलाइन सेवा आज सायंकाळी ४ वाजल्यापासून २१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत ऑनलाइन शासकीय कामे करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे तसेच इतर शासकीय सेवांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाची कामे शक्यतो सेवा बंद होण्यापूर्वी पूर्ण करून घ्यावीत.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

सोलापुरातील चार हुतात्मा चौकपासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत काढण्यात आली रॅली

सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून काढण्यात आली रॅली

काँग्रेसच्या या रॅलीत मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले आहेत

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन बालिकेच्या हत्या व अत्याचार प्रकरणात आज विशेष सरकारी वकील यांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे आरोपी विजय खैरनार याला अखेर फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली; खासदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसकडून रॅली काढण्यात आली. चार हुतात्मा चौकातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सुनेत्राताई पवारांच्या हस्ते 'आठवणीतले दादा' स्मरणपुस्तिकेचे प्रकाशन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाला उजाळा देणाऱ्या ‘आठवणीतले दादा’ या स्मरणपुस्तिकेचे प्रकाशन मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून ही पुस्तिका साकारण्यात आली आहे. यामध्ये अजितदादांचे नेतृत्व, संघर्षमय जीवनप्रवास, विकासाभिमुख विचार, धडाडीचे कार्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा भावपूर्ण शब्दांत आढावा घेण्यात आला आहे.

अमरावती विद्यापीठात बॅटरीच्या स्फोटाने आग; तीन दुचाकी जळून खाक

अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या अतिसंवेदनशील गोपनीय विभागाच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, एका दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या, तर एका दुचाकीचे अंशतः नुकसान झाले. परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नांदेडमध्ये कार पुलावरून मन्याड नदीत कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती बचावला

नांदेडच्या कंधार तालुक्यातील बहादरपूर पुलावर मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून मन्याड नदीत कोसळली. या दुर्घटनेत पार्वतीबाई गुट्टे यांचा बुडून मृत्यू झाला, तर पती लक्ष्मण गुट्टे यांना पोहता येत असल्याने त्यांनी नदीबाहेर येत स्वतःचा जीव वाचवला. हे दाम्पत्य नांदेडहून मुखेड तालुक्यातील सावरगाव वाडीकडे जात होते. क्रेनच्या साहाय्याने कार आणि पार्वतीबाई यांचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला.

नाशिकमध्ये मोठा वाद! त्र्यंबकेश्वरच्या धर्मध्वजावर खासगी संघटनेचा लोगो लावल्याप्रकरणी आक्षेप; प्रशासनाची उडाली दाणादाण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीच त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर उभारलेल्या ३१ फुटी धर्मध्वजस्तंभावरील बोधचिन्हावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचे पूजन झाल्यानंतर, यावर त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे स्वतंत्र बोधचिन्ह वापरण्यात आल्याचा आक्षेप देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी घेतला आहे. कुंभमेळ्याचा धर्मध्वज हा सर्व धार्मिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणारा असावा आणि त्यावर समुद्रमंथन व चौदा रत्नांचे चित्रण असावे, अशी मागणी होत असल्याने आता ऐन सोहळ्याच्या तोंडावर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक,महायुती मधील वाद चव्हाट्यावर

धाराशिव - मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्तेत असणाऱ्या महायुती मधील वाद चव्हाट्यावर आला आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित ठेवलेल्या पदवीधरांच्या मेळाव्याला शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना नेते गैरहजर राहिले आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना पक्षाचे झेंडे,बॅनरवर नेत्यांचे फोटो झळकले मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेनेचा एकही छोटा मोठा पुढारी फिरकलाच नाही.

निळवंडे धरणातून पाणी सोडल्याने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला काहिसा दिलासा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरण समुहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडल्याने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.. प्रवरा नदिवरील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी नदिवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी हे पाणी नदीपात्रात झेपावत आहे.. दुष्काळामुळे खरीप पिक तर हातचे गेले आहे, मात्र आता जनावरांचा चारापाणी आणि गावागावातील पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडल्याने नागरीकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

शिरूरच्या आनंद सोसायटीत गोळीबाराचा थरार; रहिवाशाच्या पायाला गोळी, प्रकृती चिंताजनक

शिरुर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलय शिरूर शहरातील रामलिंग रोडवरील आनंद सोसायटीत चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याला पकडण्याच्या प्रयत्नात एका रहिवाशाच्या पायाला गोळी लागली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 39.85 टक्के जलसाठा शिल्लक

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्प्रकल्पाची संकल्पित क्षमता 11.97 दशलक्ष घनमीटर असताना सध्या 4.77 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे.म्हणजेच 39.85 टक्के जलसाठा शिल्लक आहे..

त्यातील मृत जलसाठा वगळता प्रत्यक्ष वापरासाठी अवघे २९ टक्के पाणी शिल्लक राहते. या मर्यादित साठ्यातून पुढील जवळपास आठ महिने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर आहे.

कोल्हापूरकरांवर पाणी कपातीचे संकट

पाणी वाचवण्यासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून आजपासून शहरात दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार ही कपात केली जाणार असून, त्यामुळे शहरवासीयांना दररोजच्या तुलनेत कमी पाणी मिळणार आहे. पाणी बचतीसाठी महापालिकेने उपसा आणि पाणी वितरणाच्या वेळेत कपात करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीपूर्वी होणार की दिवाळीनंतर, याकडे आता कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती पवित्र पोर्टल मार्फत करणे आणि या नियुक्त्यांसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे, त्यामुळे अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार धर्मरावबाबा आत्राम सचिव असलेल्या भगवंतराव स्मृती शिक्षण संस्थेला अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेचा दर्जा मिळाला आहे.

मटका किंग व्हीआयपी दर्शन प्रकरणी दोन दिवस उलटूनही कारवाई नाही

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तीला व्हीआयपी दर्शन दिल्याच्या प्रकरणावरून आता भोपे पुजारी मंडळ आक्रमक झालंय. प्रकरण समोर येऊन दोन दिवस उलटले, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दाखल झाली; मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याचा दावा करत पुजारी मंडळाने मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सामान्य भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असताना, मटका किंगला थेट गाभाऱ्यात प्रवेश कसा मिळाला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलीय. एवढंच नाही, तर एका व्यक्तीला गाभाऱ्यात प्रवेश मिळत असेल, तर वशिल्याने अशाच प्रकारे शेकडो जणांना व्हीआयपी दर्शन दिलं जातं का, हेही तपासण्याची मागणी त्यांनी केलीय. संबंधितांवर कारवाई करावी,अन्यथा मंदिर कार्यालयात आंदोलन करू आणि वेळप्रसंगी न्यायालयातही जाऊ,असा इशारा अमरराजे कदम यांनी दिलाय.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात महावितरणच्या डीपी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महावितरणच्या डीपी चोरी करण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. महावितरणच्या डीपी मधील महागडी तांब्याची तार चोरी करून विकण्यासाठी चोरटे महावितरण ची डीपी चोरत होते.

या गुंन्ह्याच गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पुणे शाखा क्रमांक तीन पथकाने डीपी चोरी करणाऱ्या टोळी तील तीन चोरट्यांना मरकळ भागातून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून जवळपास पाच लाख 91 हजार रुपये किमतीचे तांब्याचे तार, चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यार आणि दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले असून महावितरणचे डीपी चोरीचे सहा गुन्ह उघडकीस आणले आहेत. संभाजी जैसवार, विनोद जैसवार आणि मनीष प्रसाद या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून जुल्फकार खान हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

24 तास उलटूनही दुसऱ्या दिवशी चामोर्शी जामच - भेंडाळा परिसरातील 14 गावांचे चक्काजाम आंदोलन सुरूच

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे भेंडाळा परिसरातील 14 गावांच्या नागरिकांनी पुकारलेले चक्काजाम आंदोलन 24 तास उलटूनही सुरूच आहे. MIDC साठी शेती न देण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. 24 तासांपासून रस्ता रोकोमुळे संपूर्ण चामोर्शी जाम झाले असून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश शिंगाडे यांनी.

मी सध्या उभा आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे. माझ्या मागे आपण बघू शकता, भेंडाळा परिसरातील 14 गावांतील नागरिकांचा हा चक्काजाम आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 24 तास उलटून गेले, तरीही एकही नागरिक या रस्त्यावरून हटलेला नाही.

पुणे जिल्ह्यात पीक नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण,जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती

परिस्थितीच्या 'दुष्काळी पार्श्वभूमीवर, पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

येत्या रविवारपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.त्यानंतर राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत,'

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पावसाची कमतरता राहिली, तरी नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करता यावा या दृष्टीने पाण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे,' अशी माहिती डुडी यांनी दिली.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार दावे व हरकती २६ ऑक्टोबरपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : मंत्र्यांचा 'डीपफेक व्हिडिओ' पाहून अधिकारी सायबर जाळ्यात; १७ लाख गमावले

सायबर गुन्हेगारांनी आता एआयच्या माध्यमातून एडिट केलेल्या देशाच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या आणि व्हिडिओंचा घातक ट्रेंड सुरू केला आहे. फेसबुकवर मंत्र्यांची शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत खोटी क्लिप पाहणाऱ्या एका कंपनीतील प्रोडक्शन ऑफिसरला सायबर गुन्हेगारांनी फॉरेक्स ट्रेडिंगच्या बोगस जाळ्यात ओढले. ६१ दिवस त्यांना आभासी पोर्टफोलिओमध्ये अडकवून ठेवत तब्बल १७ लाख ३४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जटवाडा परिसरात राहणारे ४० वर्षीय तक्रारदार शेंद्रा येथील एका नामांकित कंपनीत प्रोडक्शन ऑफिसर आहेत.

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये १३,७८५ कोटी रुपयांची घट

मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर काँग्रेसचा सवाल

मुंबई महापालिकेच्या घटत्या ठेवी आणि वाढत्या आर्थिक दायित्वांवर काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांचे आयुक्तांना पत्र

२०२१ मध्ये ९१,६९० कोटींच्या ठेवी; फेब्रुवारी २०२६ पर्यंत ७७,९०५ कोटींवर आल्याचा पत्रात दावा

अलीकडील आठ महिन्यांत ठेवींमध्ये ३,५४४ कोटी रुपयांची घट झाल्याचे पत्रात नमूद

महापालिकेच्या विविध प्रकल्पांची एकूण आर्थिक बांधिलकी सुमारे २.४४ लाख कोटी रुपये असल्याचा दावा

कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सिमेंट काँक्रीट रस्ते, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश

चालू आर्थिक वर्षात सुमारे ८ हजार कोटी रुपये कंत्राटदारांना देय असल्याचा उल्लेख

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

मुख्यमंत्री फडणवीसांचा पाचही जागा महायुती लढवणार असल्याचा दावा

महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट

अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा

पुणे शिक्षक मतदारसंघात सानप यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद

काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, शिंदेंचे स्पष्टीकरण

भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासमोर सचिन सानप यांचे आव्हान

सानप विरुद्ध गावडे लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.