Long Hair Care Tips For Women: केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय, मेथी आणि तांदळाचा हेअर सीरम लावा

Manasvi Choudhary

केसांचे आरोग्य बिघडते

आजकालची धावपळीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यासोबतच केसांवरही होतो.

Long Hair Care Tips For Women

केसांच्या समस्या

केस गळणे, केस कोरडे व निर्जीव होणे, केसांत कोंडा होणे या समस्या अगदी सामान्य बनल्या आहेत.

Hair Loss

घरगुती नैसर्गिक उपाय

या समस्यांवर उपाय करण्यासाठी बाजारातील केमिकल प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगुती नैसर्गिक उपायांचा वापर करणे फायदेशीर आहे.

Long Hair Care Tips For Women

घरगुती हेअर सीरम बनवण्यासाठी साहित्य

तांदूळ, मेथीचे दाणे, कोरफड जेल, गुलाबजल, खोबरेल तेल, रोझमेरी ऑइल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे साहित्य वापरा.

Homemade Hair Serum

सीरम बनवण्याची सोपी पद्धत

रात्री झोपताना एका भांड्यात मेथीचे दाणे आणि तांदूळ वेगवेगळे किंवा एकत्र भिजत घाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्या.

Long Hair Care Tips For Women | yandex

आता हे पाणी गॅसवर हलके उकळून घ्या आणि नंतर थंड होऊ द्या.

पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात गुलाबजल आणि कोरफड जेल नीट मिसळा.

Long Hair Care Tips For Women

शेवटी यामध्ये खोबरेल तेल व रोझमेरी ऑइल्सचे २ ते ३ थेंब आणि व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल फोडून टाका.

तयार झालेले हेअर सीरम एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि केसांना नियमित लावा.

Long Hair Care Tips For Women

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: Fruit Storage Tips: फळे फ्रिजमध्ये ठेवावी की फ्रिजबाहेर?

Fruit Storage Tips
येथे क्लिक करा...