Parbhani Crime News  Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News: घटस्फोटाच्या सुनावणीला कोर्टात आलेल्या पत्नीसोबत घडलं भयंकर, रागाच्या भरात पतीनं....

घटस्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टाच्या परिसरात आलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केले

साम टिव्ही ब्युरो

राजेश काटकर

Parbhani Crime News : परभणीत भयंकर घटना घडली आहे. घटस्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टाच्या परिसरात आलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केले. यात ती गंभीर जखमी झाले. आज, दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जेएमएफसी कोर्टाच्या परिसरात स्वच्छतागृहाजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घटस्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टात आलेल्या पत्नीवर पतीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने परभणी (Parbhani) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणात आरोपी पतीला नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिंतूर येथील प्रकरण परभणी येथील जेएमएफसी कोर्टात सुरू आहे. आज पती ज्ञानेश्वर खनपटे आणि पत्नी वैष्णवी हे घटस्फोटाच्या सुनावणीसाठी परभणीतील न्यायालयात आले होते. तडजोड न झाल्याने रागावलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केले.

कोर्टाच्या परिसरातील स्वच्छतागृहाजवळ घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या वैष्णवीला उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पती ज्ञानेश्वर खनपटे याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

SCROLL FOR NEXT