Paper Leak Case Saam Tv
महाराष्ट्र

Paper Leak Case: मोठी बातमी! १० कोटींचा दंड अन् १० वर्षे कारावास, पेपरफुटी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Jail Proposed for Exam Scams: पेपरफुटी करणाऱ्यांची आता काहीच खरं नाही. पेपरफुटी केली तर दोषींना १० वर्षांचा कारावासाची शिक्षा आणि १० कोटींचा दंड भरावा लागणार आहे.

Priya More

गणेश कवडे, मुंबई

पेपरफुटी प्रकरणात यापुढे मोठी कारवाई केली जाणार आहे. पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० कोटींचा दंड ठोठावला जाणार आहे. त्याचसोबत त्याला १० वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली आहे. भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने दुसरा अहवाल सादर केला. या अहवालामध्ये पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस करण्यात आली आहे.

संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांच्या कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवली आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाखांपर्यंत दंड ठोठवला जावा अशी तरतूद करण्यात आली. गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटींपर्यंत दंड आणि ८ वर्षांसाठी बंदी असणार आहे. परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस करण्यात आली.

गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (STF) स्थापन करण्याची सूचना द्यावी. परीक्षा गैरप्रकारांचे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची शिफारस करण्यात आली आहे. हा निर्णय झाल्यास एमपीएससी परीक्षार्थिंना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची देखील शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे. उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास हरकतीसाठी भरलेले शुल्कही परत मिळणार आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणीची सुविधा देण्यात येईल. परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय बदल सुचवण्यात आलेत. रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी Integrated Requisition Portal विकसित करण्याची शिफारस करण्यात आली. सप्टेंबरअखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे असे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना देण्यात आली.

परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (Venue Bank) तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या निवडी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस केली. राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल. राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर केला गेला. या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Rules : टोल चोरीला बसणार कायमचा चाप, नंबर प्लेटबाबत सरकारचा मोठा निर्णय

Cold Ears in Winter : थंडीच्या दिवसांत कान का दुखतात? पटकन करा 'हे' घरगुती उपाय, गंभीर आजारांपासून होईल बचाव

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आवादा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक

हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असणारी काद्यांच्या पातीची भाजी कशी बनवायची?

Badlapur : बदलापुरात लखनऊ पॅटर्न, भटक्या श्वानांसाठी उभारलं जाणार शेल्टर, नेमकं काय केलं जाणार?

SCROLL FOR NEXT