पनवेल महापालिकेसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युती जाहीर
महायुतीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट
प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी अधिकृत घोषणा केली
नवी मुंबईत महायुतील पक्ष एकमेकांविरुद्धात दंड थोपटणारे पक्ष पनवेल महानगरपालिकेत युती करणार आहेत. पनवेल महापालिकेसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना याची युती झाली आहे. या युतीचे जागावाटपही जाहीर करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी हे जागावाटप जाहीर केलं. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपले जागावाटप जाहीर केले आहे.
पनवेल महापालिकेसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आरपीआय आठवले अशी युती झाली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शेकाप, ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यासह इतर घटक पक्षांची आघाडी झाली आहे. पनवेल महापालिकेसाठी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. भाजप आपले ७१ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. तर शिंदेंची शिवसेना चार जागांवर लढणार आहे.
भारतीय जनता पार्टी - ७१
शिवसेना शिंदे गट - ४
राष्ट्रवादी अजित पवार गट - २
आरपीआय आठवले गट - १
शेतकरी कामगार पक्ष - ३३
शिवसेना ठाकरे - १९
राष्ट्रवादी शरद पवार गट - ७
मनसे - २
काँग्रेस - १२
समाजवादी पार्टी -०१
वंचित बहुजन आघाडी - १
इतर - ३
पनवेल महापालिकेसाठी जरी युतीची घोषणा करण्यात आली आहे. तर नवी मुंबई महापालिकेमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढणार आहे. दोन्ही पक्ष सर्व 111जागांवर उमेदवार उभे करीत आहेत. मंगवळवारी सकाळी दोन्ही पक्ष त्यांच्या उमेदवारांना एबी फॅार्म देणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.