PANVEL-KARJAT RAILWAY LINE DOUBLING saam tv
महाराष्ट्र

पनवेल-कर्जत प्रवास होणार सुसाट! रेल्वे मार्गासाठी 497 कोटी मंजूर; प्रवाशांना होणार मोठा फायदा

Panvel Karjat Railway Line Doubling Project Latest Update: पनवेल-चौक-कर्जत रेल्वे मार्गातील 10.86 किमी दुपदरीकरण प्रकल्पाला भारतीय रेल्वेची मंजुरी मिळाली असून यासाठी 497 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पामुळे प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या चौक कर्जत रेल्वे विभागाच्या 10.86 किलोमीटर लांबीच्या दुपदरीकरण प्रकल्पाला भारतीय रेल्वेने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पनवेल चौक-कर्जत रेल्वे मार्गाचा चौक कर्जत महत्वाचा भाग आहे. सध्या या मार्गावर एकेरी रेल्वे मार्ग असल्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या क्षमतेवर मर्यादा येतात. दुपदीरकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर अतिरिक्त रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रत्येक दिशेने दररोज पाच अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्याची क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच दुपदरीकरणामुळे दरवर्षी 18.35 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक हाताळण्याची क्षमता वाढणार आहे. मालगाड्यांना होणारा विलंब आणि थांबे कमी करण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.

रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी दुपदरीकरण, तिपदरीकरण, चौपदरीकरण, उड्डाणपूल आणि बायपास अशा विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भारतीय रेल्वेकडून भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चौक-कर्जत रेल्वे विभागाच्या दुपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेची क्षमता वाढण्यासोबतच प्रवासी आणि मालवाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT