Pankaja Munde Win  Saam Digital
महाराष्ट्र

Pankaja Munde Win : पंकजा मुंडे ५ वर्षांनी पुन्हा आमदार, बहीण प्रीतम मुंडे कॅमेऱ्यासमोर बोलता बोलता रडल्या!

Vidhan Parishad Election Result : विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. यावेळी त्यांच्या बहीण माजी खासदार प्रितम मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पराभवाला समोरं जावं लागल्यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का बसला होता. मात्र भाजपने त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी विधान परिषदेत संधी दिली होती. मात्र १२ उमेदवार असल्यामुळे सर्व उमेदवार हाय टेन्शनमध्ये होते. अखेर पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. त्यांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळाली आहेत. आता उत्सुकता असेल ती त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळते की नाही याची.

पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर त्यांच्या बहिण माजी खासदार प्रितम मुंडे भावूक झाल्या, त्यांना अश्रू अनावर झाले. अतिशय आनंदाची आणि स्वप्नपूर्तीची भावना आहे. गेले अनेक दिवस आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक माणसाचा हा विजय असल्याचं त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पाच युवकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असं पाऊल उचललं नसतं तर बरं झालं असतं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान पंकजा मुंडे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर बीड शहरासह जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. गुलालांची उधळण करत फटाक्याची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केलाय.परळी वैजनाथ येथील पंकजा मुंडे यांचे निवासस्थान असलेल्या यशश्री बंगल्यासमोर मुंडे समर्थकांनी गुलालालची उधळण केली आहे. यावेळेस कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT