Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : नाराजीच्या चर्चांवर पंकजांनी सोडलं मौन, सांगितलं नेमकं कारण

जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pankaja Munde News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी नड्डा यांची दुपारी चंद्रपुरात सभा झाली आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. दरम्यान जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमापासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली होती.

जे.पी नड्डा यांच्या औरंगाबादेतील कार्यक्रमाच्या पत्रिकेवरवरून पंकजा मुंडे यांचा फोटो डावलण्यात आला. कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचा फोटो नव्हता. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, यावर आता खुद्द पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

निमंत्रण पत्रिकेत माझं नाव असण्याचं काही कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे म्हणणं चुकीचं आहे. मला भाषणासाठी कमी वेळ दिला हे म्हणणंही चुकीचं आहे, कारण वेळ कमी होता आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं भाषण महत्तावचं होतं,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'गोपीनाथ मुंडे होते त्यावेळीही आणि त्यांच्यानंतरही माझा संघर्ष सुरूच आहे. संघर्षातून शिकायला मिळतं. महापुरुषांबद्दल बोलणं टाळलं पाहिजे. सर्वच महापुरुषांच्या नशिबी संघर्ष होता, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. तसेच पक्षाचे आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत. तसंच भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन करत भाषण संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Resolution 2026: नवीन वर्षात, नवीन सुरूवात; स्वत:साठी करा हे संकल्प

New Zealand New Year Celebration Video: जगात सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन का होतं? बघा VIDEO

Bunty Jahagirdar firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार

Maharashtra Politics: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड, भाजपने बड्या नेत्याला पदावरून तडकाफडकी हटवलं

New Year Lucky Zodiac: नवीन वर्षात या राशीचं नशीब चमकणार, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT