Eknath Shinde And Uddhav Thackeray
Eknath Shinde And Uddhav ThackeraySaam Tv

Maharashtra Politics : '...तर राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू शकते; कायदेतज्ञ असीम सरोदे असे का म्हणाले ?

सत्ता संघर्षाच्या विषयावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मत व्यक्त केलं आहे.

Maharashtra Political Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि भाजप आणि सत्ता स्थापन केली असून या सत्ता स्थापनेच्या विरोधात शिवसेना न्यायालयात गेली आहे. यासाठी पाच न्यायमूर्तींची घटनापीठ स्थापन करण्यात आलेले आहे. या सत्ता संघर्षाच्या विषयावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मत व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde And Uddhav Thackeray
Indrajeet Sawant Historian : छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते की धर्मरक्षक? इंद्रजित सावंत म्हणतात...

कायदेतज्ञ असीम सरोदे पत्रकार परिषदेत म्हणाले, 'आता पाच न्यायाधीशांच्या घटनापती आहे. मात्र ते सात न्यायाधीशांच्या घटनापीठ असायला हवं अशी आमची मागणी आहे. या प्रकरणात नवीन न्यायाधीशांना घेण्यात येईल. त्यांच्यासमोर ही केस चालेल'.

'आपण भारतीय संविधानाच्या दहाव्या शेड्यूलचा विचार केला, तर दहाव्या परिशिष्टातील दोन एक ए नुसार स्पष्टपणे पक्षविरोधी कारवाया जे करत असतील, त्यांना अपात्र धरण्यात येऊ शकते, असे पुढे सरोदे पुढे म्हणाले.

'पक्ष सोडला नसेल तरीसुद्धा स्वतःच्या वागणुकीनुसार शिंदे गटाने पक्षविरोधात काम केलं आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात येऊ शकते आणि काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

Eknath Shinde And Uddhav Thackeray
Sanjay Gaikwad On Raut : राऊत स्वतःच भांडी घासतो...; खोके-बोकेनंतर भांडी घासण्यावरून टोमणे...

राज्यपाल हे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे कर्णधार - असीम सरोदे

असीम सरोदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बेताल वक्तव्यावरही भाष्य केलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बेताल आणि उश्रृख वक्तव्य करणाऱ्यांचे कर्णधार असून त्यामुळे त्यांनी राज्यपाल पद सोडून ते ज्या पक्षातुन आले त्यात जाण्याची गरज आहे, असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

राज्यपाल राजकीय पक्ष आणि त्याचे विचार बाजूला ठेवू शकलेले नाही. ते अजून एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून वागत आहे. त्यामुळेच ते सातत्याने बेताल वक्तव्य करता आणि घटना बाह्य वागतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून राजकीय व्यक्ती जे बेताल वक्तव्य करत आहे. त्यावर लगाम लावण्यासाठी एका प्रभावी कायद्याची गरज देखील असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com