Pankaja Munde Ahmednagar Vidhan Sabha News Saamtv
महाराष्ट्र

Pankaja Munde : विधानसभेपूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा भाजपला मतदान नाही; ग्रामस्थांचा इशारा

Satish Daud

आगामी विधासभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा भाजपला मतदान नाही, असा थेट इशारा बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी दिला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ बीडच्या सानपवाडीतील येथील ग्रामस्थांनी शनिवारी (ता. २२) एक बैठक घेतली. या बैठकीला गावातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात नागरिकांनी चर्चा करून एकमताने ठराव देखील घेतला आहे. आता ग्रामस्थांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर पंकजा मुंडे राजकीय पुनर्वसनाविषयी भाजप काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशा पद्धतीचा निर्णय न झाल्यास भाजपाला राज्यात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या रोशाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी जवळपास ६ हजार मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव भाजप कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

कारण, मुंडे घराण्याच्या हातात असलेला बीड मतदारसंघ हा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या आक्रमक नेत्या असून त्यांची बीड जिल्ह्यात मोठी ताकद आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या असल्याने त्यांची जिल्ह्यात लोकप्रियता आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेवर सूचवले असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. ओबीसी नेत्या म्हणून पंकजा यांची ओळख असल्याने त्यांना राज्यसभेवर संधी दिली जावी, असं महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राला सूचित केलं आहे.

त्यामुळे पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार की त्यांना पुढील निवडणुकीची वाट बघावी लागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी २०१९ विधानसभा निवडणुकीत बीडच्या परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी देखील पंकजा यांना विधानपरिषदेवर घ्यावं, असा सूर त्यांच्या समर्थकांचा होता. मात्र, त्यावेळी भाजपने त्यांना संधी दिली नव्हती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

SCROLL FOR NEXT