Chhagan Bhujbal VIDEO : माझं राजकीय करियर संपवणं जनतेच्या हातात; जरांगेंच्या धमक्यांना घाबरत नाही; छगन भुजबळ कडाडले

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil : मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. आमदारकी काय चीज आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.
माझं राजकीय करियर संपवणं जनतेच्या हातात; जरांगेंच्या धमक्यांना घाबरत नाही; छगन भुजबळ कडाडले
Manoj Jarange Patil and Chhagan BhujbalSaam Digital
Published On

मराठा आरक्षणाला विरोध केला तर छगन भुजबळ यांच्यासह ९ मंत्र्यांचं राजकीय करिअर संपवणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्याचा मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. आमदारकी काय चीज आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा संघर्ष रंगला आहे. सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. मात्र, राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जालन्याच्या वडीगोद्री येथे उपोषणला सुरुवात केली.

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून उगाच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अशी मागणी हाके यांनी केली. जोपर्यंत राज्य सरकार ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करून लेखी देत नाही. तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला. यावरून मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त करत थेट छगन भुजबळ यांना टार्गेट केलं.

माझं राजकीय करियर संपवणं जनतेच्या हातात; जरांगेंच्या धमक्यांना घाबरत नाही; छगन भुजबळ कडाडले
OBC Andolan : मराठ्यांना खुशाल आरक्षण द्या, पण त्यांच्या जमिनी अन् कारखाने आमच्या नावावर करा; ओबीसी बांधव खवळले

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण या आंदोलनामुळे छगन भुजबळ यांचाच हात असल्याचा आहे. ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केलाय. कुणबी नोंदी रद्द केल्यात तर छगन भुजबळ यांच्यासह ९ मंत्र्यांचं राजकीय करिअर संपवणार, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या या इशाऱ्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. आमदारकी काय चीज आहे. माझं राजकीय करिअर संपवणं हे माझ्या पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहेत. मनोज जरांगे यांच्या धमक्यांना मी घाबरत नाहीत. ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरून मी आंदोलन करेल, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

माझं राजकीय करियर संपवणं जनतेच्या हातात; जरांगेंच्या धमक्यांना घाबरत नाही; छगन भुजबळ कडाडले
Manoj Janare News: कुणबी नोंदी रद्द करणं तुम्हाला पेलणार नाही; मनोज जरांगे पाटील खवळले, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com