Pandharpur Wari Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Wari: पाऊले चालती पंढरीची वाट! ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम कोणत्या दिवशी कुठे असणार? संपूर्ण दिनक्रम वाचा

Pandharpur Wari Dnayneshwar Maharaj Palkhi Route: विठुरायाला भेटण्याची आस लाखो वारकऱ्यांना लागली आहे. या वारीला जाण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे. या पालखीचा दिनक्रम वाचा.

Siddhi Hande

पंढरीची वाट चालली वारकऱ्यांची माळ...” संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा २०२५ सालचा आषाढी वारी मार्ग निश्चित झाला आहे. १९ जून रोजी आळंदीहून निघणारी पालखी, प्रेम, भक्ती आणि हरिपाठ घेऊन १० जुलै रोजी पंढरपूरात श्रीविठोबाच्या चरणी विसावणार आहे. सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, माळशिरस, वाखरी – अशा भक्तिरसात न्हालेल्या गावांमधून माऊलींचा रथ जात राहील. पावसाच्या सरी, टाळमृदंगाचा गजर, "ज्ञानोबा-तुकाराम" चा जयघोष आणि दिंड्यांचा महासागर – या वातावरणात ३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार आहे. २१ जुलै रोजी पालखी परतीची वाट धरून आळंदीत परत येणार आहे. या वारीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र श्रद्धेने न्हावून जाणार आहे.

पालखी सोहळ्याचा दिनक्रम (Dnyaneshwar Maharaj Palkhi daily route date wise)

१९ जून २०२५ रोजी पालखीचा मुक्काम गांधी वाडा, आळंदी येथे प्रस्थान करणार आहे. २० जून रोजी पालखी आळंदीवरुन निघून भवानी पेठ पुणे येथे जाणार आहे. तिथे ते रात्रीचा मुक्काम घेणार आहेत. २२ जून रोजी पालखी पुण्यातून निघणार आहे. दुपारचा मुक्काम हा हडपसर येथे होणार आहे. त्यानंतर रात्रीचा मुक्काम सासवड येथे होणार आगे. २४ जून रोजी हा मुक्काम जेजुरीला होणार आहे.यानंतर २८ जून रोजी पालखीचा मुक्काम फलटण येथे असणार आहे.

३० जून रोजी पालखीचे प्रस्थान नातेपुते येथे होणार आहे. १ जुलै रोजी पालखी माळशिरस येथे मुक्काम करणार आहे. ४ जुलै रोजी पालखी वाखरी येथे मुक्कासाठी थांबणार आहे. यानंतर ५ जुलै रोजी पालखी पंढरपुरला पोहचणार आहे. ६ जुलै रोजी चंद्रभागा येथे स्नान केले जाणार आहे. त्यानंतर पालखी १० जुलै रोजी परतीच्या प्रवासासाठी परत निघणार आहे.

आषाढी २०२५ वेळापत्रक.pdf
Preview

पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची ओढ

दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने जातात. विठुरायाला कधी एकदा भेटेन असं त्यांच्या मनात सुरु असतं. २०-२१ दिवसांची पायवारी करत ते आपल्या विठुरायाला भेटतात तो दिवस म्हणजे आषाढी एकदाशीचा (Aashadi Ekadashi). आषाढी एकादशी हा दिवस वारकऱ्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. या दिवशी लोक चंद्रभागेत स्नान करतात. त्यानंतर विठुमाऊलीचे दर्शन घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT