Surabhi Jayashree Jagdish
इराणी चहा, बन-मस्का आणि ब्रुन-बटर हा अगदी जिव्हाळ्याचा कॉम्बो मानला जातो. जुनी झिजलेली लाकडी टेबलं, जुन्या भिंती आणि साधे लाईट्स यामुळे इराणी हॉटेल्सशी शोभा वाढते.
आज आम्ही तुम्हाला मुंबईतील काही इराणी कॅफेंबाबत माहिती देणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन मस्त खाण्याचा आनंद घेऊ शकता
ही सर्वात प्रसिद्ध बेकरी असून बन-मस्का आणि इराणी चहा म्हणजे क्लासिक कॉम्बो. इथे लाकडी टेबलं, जुन्या भिंती आणि शांत वातावरण कायम ठेवलेलं आहे.
याठिकाणची ताजा बन मस्का आणि ऍपल पाय प्रसिद्ध आहे. भिंतींवर अजूनही जुन्या काळातील पोस्टर्स आणि घड्याळं लावलेली दिसतात.
इथे चहा, पॅटीज आणि ओव्हन बेक केलेले केक अप्रतिम मिळतात. दुकानाच्या बाहेर बसून लोकल आणि पर्यटक पाहण्याची मजा वेगळीच असते. थोडंसं महाग वाटेल पण अनुभव एकदम ओरिजिनल इराणीचा मिळेल.
शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या या बेकरीची पेस्ट्री खास आहे. मावा केक, पफ आणि क्रीम रोल खूप लोकप्रिय आहेत.
याठिकाणी ऑमलेट पाव आणि कटलेट खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असते. सकाळच्या नाश्त्याची खास सुगंधी वर्दळ मिळते. थोडंसं लोकल स्टाइल आणि एकदम ओरिजिनल इराणी टच तुम्हाला याठिकाणी मिळेल.
हे ठिकाण मटण आणि चिकन डिशेससाठी फेसम आहे. सिंपल इंटीरियर पण अन्नाचा स्वाद मात्र एकदम दमदार आहे. सोबतीला गरम पाव आणि चहा, म्हणजे परफेक्ट मील बनेल.