Shruti Vilas Kadam
शबाना आझमी यांचा जन्म १८ सप्टेंबर १९५० रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कैफी आझमी (प्रसिद्ध शायर) आणि आईचे नाव शौकत आझमी (थिएटर अभिनेत्री) आहे. कलात्मक वातावरणात वाढ झाल्याने अभिनयाची गोडी लहानपणापासूनच होती.लेहेंग्यापासून साडीपर्यंत...; लग्नसराईत या आऊटफिटमुळे मिळेल एक ग्लॅमरस लूक
शबाना आझमी यांनी करिअरच्या सुरुवातीला आर्थिक अडचणींना तोंड दिले. त्यांनी एका पेट्रोल पंपवर कॉफी विकण्याचे काम केले. दररोज फक्त ३० इतका त्यांचा मोबदला मिळत होता.
१९७४ साली शबाना यांनी ‘अंकुर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
शबाना आझमी यांनी आतापर्यंत १५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
त्यांना आतापर्यंत ५ राष्ट्रीय पुरस्कार आणि असंख्य फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक सन्मानित अभिनेत्रींपैकी एक आहेत.
शबाना आझमी या फक्त अभिनेत्री नसून सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि गरीबी निर्मूलन यांसारख्या विषयांवर सक्रियपणे काम केले आहे.
आज शबाना आझमी या भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांची एकूण नेट वर्थ अंदाजे २०० कोटी आहे. संघर्षातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज प्रेरणादायी ठरला आहे.