Shruti Vilas Kadam
हलक्या रंगातील ऑर्गेंजा लहंगा आणि त्यावर झरी किंवा सीक्विन वर्क असलेला डिझाईन ब्राईड्समेडला रॉयल आणि एलिगंट लुक देतो. हलके वजन असल्याने लग्नातील फंक्शनसाठी परफेक्ट आहे.
फ्लोईंग जॉर्जेट साडी आणि मिररवर्क ब्लाउजचा कॉम्बिनेशन हा क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही आहे. यात तुम्ही पारंपरिकतेसह आधुनिक टच देऊ शकता.
खाली फिश-शेप असलेला लहंगा आणि वर फिटेड ब्लाउज हा परफेक्ट फ्यूजन लुक आहे. तो मॉडर्न, आकर्षक आणि पार्टीसाठी योग्य दिसतो.
साधी, प्लेन साडी आणि त्याला ऑफ-शोल्डर किंवा ट्यूब ब्लाउज जोडल्यास स्टायलिश पण सॉफ्ट लुक तयार होतो. जास्त सजावट नको असणाऱ्यांसाठी हा बेस्ट पर्याय.
मिरर वर्क असलेला डार्क कलर लहंगा आणि हलका दुपट्टा हा नजरेत भरणारा पर्याय आहे. तो नृत्य कार्यक्रम किंवा साखरपुड्यासाठी योग्य ठरतो.
नेव्ही ब्लू, बॉटल ग्रीन किंवा वाईन कलर साडी आणि त्यासोबत एंब्रॉयडरी ब्लाउज हा क्लासी आणि फेस्टिव्ह दोन्ही लुक देतो. हा रंग रात्रीच्या समारंभासाठी उत्तम.
केप डिझाईन ब्लाउज आणि लहंगा हा अनोखा आणि फॅशनेबल पर्याय आहे. यात पारंपरिक पोशाखाला मॉडर्न ट्विस्ट मिळतो आणि फोटोमध्येही तो आकर्षक दिसतो.