Sakshi Sunil Jadhav
आगरी स्टाईलची तांदळाची भाकरी चवीला अप्रतिम आणि मऊलुसलुशीत असते. ही भाकरी आकाराने ही मोठी असते.
बऱ्याचदा ही तांदळाची भाकरी बनवताना तुटते आणि जाड होते. अशावेळेस तुम्ही गडबडून न जाता काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
भाकरीसाठी ताजी ज्वारी, नाचणी किंवा बाजरीचं पीठ वापरा. जुने किंवा ओलसर पीठ भाकरी तुटण्याचे एक प्रमुख कारण असते.
पीठ मळताना गरम पाणी वापरा. कोमट पाण्यामुळे पीठ मऊ होतं आणि भाकरी व्यवस्थित शेकली जाते.
जास्त घट्ट पीठ तुटतं आणि सैल पीठ चिकट होतं. मऊसर, पण हाताला चिकट न लागणारं पीठ व्यवस्थित मळलेले आहे.
पीठ मळल्यावर ते ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे पीठात ओलावा टिकतो आणि भाकरी फुलून येते.
भाकरी लाटताना जास्त दाबू नका. हलक्या हाताने, एकसमान जाडी ठेवून लाटल्यास भाकरी गोल व सुंदर दिसते. शक्यतो भाकरी थापून वापरा.
तवा खूप गरम किंवा थंड असल्यास भाकरी व्यवस्थित शेकली जात नाही. मध्यम आचेवर शेकल्यास भाकरी मऊ राहते.
पहिली बाजू थोडी शेकून उलटवा, मग दुसरी बाजू थोडी फुलू लागल्यावर थेट गॅसवर शेकल्यास भाकरी सुंदर फुगते.
थंड झालेली भाकरी कडक होते. त्यामुळे ती ताजीतवानी आणि गरम असतानाच द्या. चव आणि सुगंध दोन्ही अप्रतिम लागतात.