Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Mandir : आषाढीला भाविकांना दिसेल मंदिराचे मूळ रूप; विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण

Pandharpur News : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने ७४ कोटी रूपयांचा निधी दिला आहे

भारत नागणे

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे मुळ रूप देण्याचे काम सुरू असून विठ्ठल आणि रूक्मिणीच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत भाविकांना मंदिराचे मूळ रूप पाहता येणार आहे. 

पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने ७४ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. मागील अडीच महिन्यांपासून हे काम सुरू आहे. आतापर्यंत मंदिरातील जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. (Vitthal Mandir) मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कमला गती देण्यात आली असून आषाढी यात्रेपर्यंत हे काम पूर्ण काकारण्यात येणार आहे. यामुळे आषाढी यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूळ रूपातील विठ्ठल मंदिर पाहता येणार आहे. 

मुख्यमंत्रांच्या हस्ते महापूजा 
यंदाची आषाढी एकादशी (Ashadhi ekadashi) पुढील महिन्यात १७ जुलैला आहे. आषाढीनिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. या दिवशी पहाटे विधिवत पूजा केली जात असते. त्यानुसार नव्या रुपातील विठ्ठल मंदिरात येत्या १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhindi Rassa Bhaji Recipe: तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला, तर घरीच बनवा भेंडीची रस्सा भाजी

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Business idea: डाळ मिल नाहीतर आहे रोजगार अन् पैशाचा कारखाना; गावातच सुरू करा धमाकेदार बिझनेस

Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Dry Lips Tips: ओठ खूपच कोरडे पडलेत? मग या घरगुती टिप्सने करा मऊ अन् मुलायम

SCROLL FOR NEXT