Shahaji Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News: मराठा आंदोलकांनी अडवली कार; आमदार शहाजी पाटलांनी मागितली आंदोलकांची माफी

Pandharpur News: पंढरपूर येथील येथील ठाकरे चौकात शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांची कार अडवलीय.

भारत नागणे

Pandharpur Maratha Reservation :

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील मराठा आंदोलकांनी शहाजी पाटील यांची कार अडवत घोषणाबाजी केली. (Latest News)

पंढरपूर येथील येथील ठाकरे चौकातून आमदार शहाजी पाटील यांची कार जात होती. त्यावेळी काही मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची कार अडवली. यावेळी आंदोलक आणि शहाजी पाटील यांच्या कार चालकामध्ये वादावादी झाली. त्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर आमदार पाटील यांनी खाली उतरून आंदोलकांची माफी मागितली त्यानंतर आमदारांची गाडी पुढे सांगोल्याकडे रवाना झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक घेतली. यात सर्व पक्षाने आरक्षण देण्यास सहमती दर्शवली. आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही, असं आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी वेळ द्यावा असं विनंती सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र मराठा समाज आक्रमक झालाय.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आंदोलकी आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी आक्रमक होत थेट मुंबई - आग्रा महामार्ग रोखलाय. टायर जाळत मुंबई - आग्रा महामार्ग रोखलाय. तर मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहेत. परभणी जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने होत आहेत. पाथरी शहरात तहसीलसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT