Maratha Aarakashan: मराठा आंदोलकांच्या आडून समाजकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिलं: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: लोकप्रतिनिधींच्या घरांना आग लावणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवली असून त्यांच्याविरुद्धात कारवाई केली जाणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On

Devendra Fadnavis on protesters :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांकडून ठिकाठिकाणी जाळपोळ करण्यात आली. यावर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिली प्रतिक्रिया दिलीय. मराठा आंदोलकांच्या आडून काही समाजकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण देत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्याचे गृहविभाग कडक पावले उचलत आहे. (Latest News)

काल बीडमध्ये मराठा आंदोलन तीव्र झालं होतं. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि त्यांच्या वाहनांना पेटवण्यात आलं होतं. त्यानंतर मराठा आंदोलकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला आग लावली होती. त्यानंतर राज्यभरात शांतेत चालू असलेलं मराठा आंदोलनाने उग्र झालं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी राजकर्ते आंदोलनाच्या निशाण्यावर होते. तर काही ठिकाणी आंदोलकांनी महामार्गावर टायर जाळून तेथील वाहतूक बंद पाडत आंदोलन केलं. यासर्व घटनांवरून राज्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होऊ लागले होते. यावर आता राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. लोकप्रतिनिधींच्या घरांना आग लावणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवली असून त्यांच्याविरुद्धात कारवाई केली जाणार आहे. याविषयीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर दिली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन चाललं आहे, त्याविषयी राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसे वचन दिलंय. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र याचवेळी काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत असल्यांच फडणवीस म्हणाले.

मराठा आंदोलनाच्या आडून काही समजाकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. लोकप्रतिनिधी घरी असताना त्यांनी जिवे मारण्याच्या हेतूने घर पेटवून देण्यात आल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. घरं पेटवून देण्याच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीही तपासले आहेत. हल्ल्यातील आरोपींची ओळख पटलेली आहे.

या आरोपींवर कलम ३०७ अंतर्गग गुन्हा नोंदवण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय. बीडमध्ये लोकप्रतिनीधींची घरं जाळणं, काही लोकांना टार्गेट करणं, प्रतिष्ठाण आणि दवाखाने जाळणं ही कृती काही लोकांनी केली आहे. ही कृती चुकीची आहे. त्यावर कारवाई केली जाणार आहे. परंतु जेथे शांततापूर्ण आंदोलन केले जात आहे, तेथे कोणत्याच प्रकारची कारवाई केली जाणार नाही. मात्र हिंसेला कुठेही धारा देणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; 300 फूट उंच मोबाईल टॉवरवर सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com