Maratha Aarakashan: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरू झालेल्या राजीनामा सत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक; आमदार-खासदारांना काय दिल्या सुचना?

Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या आमदारांच्या आणि खासदारांची बैठक पार पडली.
Chief Minister Shinde
Chief Minister ShindeSaam Tv
Published On

(गिरीश कांबळे)

Chief Minister Shinde In Mp And Mlas Meeting:

मराठा आरक्षणावरून राजीनामा देऊन नागरिकांचे प्रश्न सुटणार नाही. सरकरमध्ये राहून नागरिकांचे प्रश्न सोडवा. नागरिकांमध्ये जाऊन काम करा, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार आणि खासदारांना दिलाय. आज मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राजीनामा देणाऱ्या आणि सत्तेत असलेल्या आमदार आणि खासदारांना सल्ला दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. (Latest News)

शिवसेनेच्या आमदारांच्या आणि खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सगळ्या मदारांनी-खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास वर्तवला. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी जी शपथ सभेमध्ये घेतली. त्याचे तंतोतंत पालन करून ते मराठा आरक्षण देतील, त्याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्या शिवसेनेचे आमदारांना आणि खासदारांना असल्याचं मंत्री सामंत म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आरक्षण कसे टिकेल यासाठी जो प्रयत्न केला जातोय. तसेच महाराष्ट्र आरक्षण दिल्यानंतर न्यायालयामध्ये ते बाद होणार नाही, याची प्रक्रिया सगळ्या आमदारांना सांगितली. जरांगे-पाटील यांनी आधी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण केली जाईल. शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याच्यामध्ये जे काही नोंदी मिळालेले आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना आधीच मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्याचादेखील फायदा मराठवाड्यातील अनेक मराठा समाजाच्या लोकांना होणार असल्याचे सामंत म्हणाले.

आधी प्रमाणपत्र देण्याची जी सुरुवातीची मागणी होती, त्याच्यावर मुख्यमंत्री यांनी हा सकारात्मक निर्णय घेतलाय. सुप्रीम कोर्टामध्ये न्यू पिटीशन दाखवलं होतं त्याची देखील विंडो ओपन झालेली आहे. त्याच्यासाठी माजी न्यायमूर्तींची समिती नेमलेली आहे. त्यांच्याकडून सल्ला घेऊन त्यांच्याकडून मदत घेऊन टिकाऊ आरक्षण कशा पद्धतीने मराठा समाजाला मिळेल त्याच्यावर युद्धपातळीवर काम स्वतः मुख्यमंत्री करत आहेत. यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवेल, असा विश्वासही उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. आरक्षण मिळत नसल्याने मराठा आंदोलक सरकारविरोधात आंदोलन करत आहे. एक दिवसापासून या आंदोलनाने उग्र रुप धारण केलंय. एका बाजुला आंदोलक आक्रमक होत आहेत, तर दुसऱ्या बाजुला सरकारमधील आमदार आणि खासदार आंदोलनाच्या समर्थनात आपला राजीनामा देत आहेत. यामुळे राज्य सरकार अडचणीत सापडलंय.

Chief Minister Shinde
Maratha Aarakashan: मराठा आंदोलकांच्या आडून समाजकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिलं: देवेंद्र फडणवीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com