मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसांपासून शेकटा गावातील मोबाईलच्या 300 फूट उंच टॉवरवर चढून सुधाकर विश्वनाथ शिंदे या तरुणाचे आंदोलन सुरू आहे. गेल्या सात दिवसांपासून तरुण टॉवरवर आमरण उपोषण करत आहे.
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा अन्यथा मोबाईल टॉवरवरुन उडी घेऊन आत्महत्या करेल. असा इशारा या तरुणाने दिलाय. या आंदोलनकर्त्याला गावकऱ्यांनी खाली उतरवण्याची विनंती केलीय. पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी अग्निशमन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
अग्निशमन विभागाकडून उपोषणकर्त्या तरुणाला खाली घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरुण येण्यास तयार नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरवात केलीय.
एसटी बसेसवरील राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या फोटोंना फासले काळे
धुळ्यात संतप्त मराठा आंदोलकांनी परिवहन विभागाच्या एसटी बसेसवर राज्य सरकारच्या लावण्यात आलेल्या जाहिरातींच्या फोटोंवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पंतप्रधानांच्या फोटोंना काळेफासत राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत धुळ्यात देखील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उपोषण सुरू आहे. या दरम्यान संतप्त मराठा आंदोलकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोलाच काळेफासून राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध केला आहे. त्यावेळी संतप्त आंदोलकांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करून निषेध केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.