Prakash Ambedkar Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : पंधरा दिवसात देशाच्या राजकारणात नवीन बातमी; प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांबाबत खळबळजनक दावा

Pandharpur News : पंढरपूरमध्ये आले असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठा आरोप करत शरद पवार भाजपचे हस्तक असल्याचे म्हटले आहे, यामुळे देशातील राजकारणात आता काय उलथापालथ होणार याकडे लक्ष आहे

भारत नागणे

पंढरपूर : शरद पवार हे जरी देशाच्या राजकारणात दिसत असले, तरी ते भाजपचे हस्तक आहेत. देशपातळीवर खेळणारी माणसे वेगळी आहेत. आणि समोरची माणसे वेगळी आहेत. त्यामुळे लवकरच नवी बातमी समजेल. त्यामुळे देशाच्या राजकारणात कुठली नवी कलाटणी मिळणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्या असल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

पंढरपूर न्यायालयात आज कोरोना काळातील एका प्रकरणी हजर राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर देखील आरोप करत दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक झाली असली तरी शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. भाजपला सोडून ते कधीही बाहेर पडू शकत नसल्याचे ते म्हणाले. 

बॅलेटवर निवडणूक घ्या 

सध्या व्हीव्हीपीटी वरून राज्यात पॉलिटिकल पॅरालिसिस झाला आहे. त्यामुळे vvpt शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतील; तर बॅलेटवर निवडणुका घ्या. अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष आणि चिन्ह कायम राहील. कारण आयोगाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या वतीने आहे. त्यामुळे आता कोर्ट वेगळा निर्णय घेईल. असे वाटत नाहीत. 

मोदींनी मित्र देश गमावले 

नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दौऱ्यात भारतीयांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात मित्र देश गमावले आहेत. यातूनच अमेरिकेने भारतावर ७० टक्के टॅरीफ लावण्यात आले आहे. अमेरिकेशी १९० बिलियन डॉलर इतका व्यवहार आहे. यामध्ये ६० बिलियन डॉलरचा व्यवहार टेक्सटाइल आहे. यातच आता टॅरीफ लागल्याने सोलापुरी चादर आणि टॉवेल आता विकल्या जाणार नाहीत. बेरोजगारी वाढेल. अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

SCROLL FOR NEXT