Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: अचानक घर वीस फुट खचले; तीन महिला गंभीर जखमी, रहिवाशांमध्ये घबराट

अचानक घर वीस फुट खचले; तीन महिला गंभीर जखमी, रहिवाशांमध्ये घबराट

भरत नागणे

पंढरपूर : पंढरपूर शहरातील कोळी गल्लीतील घराखालची जमीन अचानक खचली. यात घर देखील (Pandharpur) खाली खचले असून या घटनेमध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

पंढरपूर शहरातील केाळी गल्‍लीतील राजू शिंदे यांचे घरातील एका खोलीतील जमीन वीस ते पंचवीस फूट खोल खचली. यामुळे येथे मोठा खड्डा पडला आहे. यावेळी घरात असलेल्‍या महिला देखील या खड्डयामध्ये पडल्‍याने तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले‌ आहे.

नागरीकांची धाव

सदर प्रकार झाल्‍यानंतर परिसरात घबराट पसरली. आवाज झाल्‍याने आजूबाजूला असलेल्‍या नागरीकांनी घराकडे धाव घेतली. तसेच या घटनेनंतर पोलीस व नगरपालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. यानंतर खड्ड्यात पडलेल्‍या तीनही महिलांना नागरीकांच्‍या मदतीने बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: क्रांती येत आहे, आम्ही सत्ताबदलाच्या दिशेने जात आहोत - संजय राऊत

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

कानाला बंदूक,२ राऊंड फायर अन् २७ किलो सोनं गायब! जळगावात चित्रपटालाही शोभेल असा बँक दरोडा, असा उघड झाला कट

भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, पेट्रोल-डिझेल आणि प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार!

SCROLL FOR NEXT