SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, पेट्रोल-डिझेल आणि प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार!

SBI Bank Credit Card Update News : SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 डिसेंबर 2026 पासून ट्रान्सपोर्टेशन आणि फ्युल व्यवहारांवर नवीन शुल्क लागू होणार आहे.

SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. SBI ने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे नवीन नियम 1 डिसेंबर 2026 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन आणि पेट्रोल-डिझेलवर क्रेडिट कार्डने पैसे भरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता अतिरिक्त भार पडणार आहे.

नवीन नियमानुसार, एका बिलिंग सायकलमध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी 30 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलसह इतर फ्युल व्यवहारांवर एका बिलिंग सायकलमध्ये 50 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास 1 टक्का अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

म्हणजेच, क्रेडिट कार्डचा वापर करून प्रवास आणि इंधनावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करणाऱ्या ग्राहकांना याचा थेट फटका बसू शकतो. त्यामुळे SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर 1 डिसेंबरपासून आपल्या खर्चावर लक्ष ठेवा. अन्यथा नेहमीच्या व्यवहारांसाठीही तुम्हाला जादा पैसे मोजावे लागू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.