Corona Virus Saam tv
महाराष्ट्र

Corona Virus : आषाढी वारीच्या तोंडावर चिंता वाढली; माळशिरस तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण

Pandharpur News : राज्यातील पुणे, मुंबई, सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हि रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे

भारत नागणे

पंढरपूर : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले असून रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे. राज्यातील वाढता कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक ठरत असून कोरोनाने सोलापूर जिल्हा प्रशासनाची आणखी चिंता वाढवली आहे. कारण माळशिरस तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढून चार वर पोहचली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. 

जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला होता. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील पंधरवाड्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. केरळ नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. राज्यातील पुणे, मुंबई, सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हि रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी बेड व्यवस्था करण्यात आली आहे. 

माळशिरस तालुक्यात रुग्ण संख्या पोहचली चारवर 
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मागील आठवड्यात दोन रुग्ण आढळून आले होते. यानंतर आता पुन्हा दोन रुग्णांची भर पडली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापुरात कोरोनाचा नवा रूग्ण आढळून आल्याने रूग्णाची संख्यावर चार वर गेली आहे. तर २९ मे रोजी अकलूज आणि माळीनगर येथे तीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले आहे.

आषाढीच्या तोंडावर चिंता वाढली 

आषाढीच्या तोंडावर कोरोना रूग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. येत्या काही दिवसात तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माउली यांचा पालखी सोहळा निघणार आहे. तर पुढील महिन्यात आषाढी यात्रा असल्याने प्रशासन अधिक अलर्ट आहे. आता वेळापूर येथे आणखी एक रूग्ण आढळून आला आहे. नागरिकांनी सामजिक अंतर पाळावे आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT