Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा संपली; महिनाभरानंतर भाविकांना मिळणार दर्शन

भारत नागणे

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मागील महिन्यापासून बंद होते. (Pandharpur) दरम्यान पदस्पर्श दर्शनाची भाविकांची असलेली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या ५ मे दरम्यान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची (Vithal Temple) माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे. (Vitthal Mandir) विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला पुरातन मूळ रूप देण्यासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार हे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यात मंदिरातील बाजीराव पडसाळीतील काम पूर्ण झाले आहे. सध्या (Vitthal Rukmini Mandir) विठ्ठल आणि रुक्मिणी गर्भगृहातील काम वेगाने सुरू आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंदिरातील सर्व कामे करण्यासाठी १५ मार्चपासून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे चरणस्पर्श दर्शन बंद आहे. या काळात देवाचे पहाटे सहा ते सकाळी ११ वाजेपर्यंत मुख दर्शन सुरू आहे. त्यामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन कधी सुरू होणार याकडेच भाविकांचे लक्ष लागले आहे. मात्र एक महिन्यानंतर भाविकांची देवाच्या पदस्पर्श दर्शनाची प्रतिक्षा संपणार आहे. तर चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ एप्रिलपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणीचे पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना मुख दर्शन सुरू राहणार आहे. तर गुढीपाडव्या दिवशी दिवसभर मुख दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT