Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : विठ्ठल मंदिरातील दर्शन रांगेत यंदा बदल; पदस्पर्श दर्शन रांग ४० फूट लांब अंतरावर

भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठल मंदिराचे जुने सातशे वर्षांपूर्वीचे मुळ रूप भाविकांना पाहाता यावे; यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरातील दर्शन रांगेत बदल केला आहे. पूर्वी जवळून असलेली पदस्पर्श दर्शनाची रांग ३० ते ४० फूट लांब तर मुख दर्शनाची रांग ५० फूट अंतरावर ठेवली आहे. 

पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्ताने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांच्या लागणाऱ्या रांगा व चांगले दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात बाऱ्या असतात. यंदा मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे मूळ रूप देण्यात आले आहे. हे मूळ रूप भाविकांना पाहता यावे या अनुषंगाने यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्ताने दर्शन रांगेत बदल करण्यात आला आहे.  

ही दर्शन रांग दोन प्रकारात असून पदस्पर्श दर्शन रांग ३० ते ४० फूट अंतरावर लांब आहे. तर मुख्य दर्शन रांग ५० फूट अंतरावर आहे. दर्शन रांग सुव्यवस्थीत केल्यामुळे भाविकांना सातशे वर्षापूर्वीचे मूळ रूप पाहाता येतं आहे. मंदिराचे मुळ रूप पाहून मालिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Marathi News Live Updates : बूथ कमिटी बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा , गोपीचंद पडळकर, तमनगौडा रवीपाटलांचे कार्यकर्ते भिडले

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT