Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Yatra : आषाढी वारीत गर्दीचे १३ ठिकाणी ब्लॅक स्पाॅट; गर्दी व्यवस्थापासाठी एआयचा वापर

Pandharpur News : आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये १० ते १२ लाख भाविक येत असतात. दशमी आणि एकादशीला महाद्वार, नामदेव पायरी, वाळवंट, प्रदक्षिणामार्ग आणि ६५ एकरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्ताने लाखो भाविक पंढपुरात दाखल होत असतात. यामुळे प्रचंड गर्दी होत असते. सद्यस्थितीला ५० हजार भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान गर्दीच्या अनुषंगाने १३ ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले असून या ठिकाणी गर्दीचे वेगळे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. तसेच आषाढी यात्रेत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये १० ते १२ लाख भाविक येत असतात. दशमी आणि एकादशीला महाद्वार, नामदेव पायरी, वाळवंट, प्रदक्षिणामार्ग आणि ६५ एकरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. दरम्यान मागील वर्षी काही ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.  यामुळे यावर्षी पोलीस प्रशासनाने १३ ब्लॅक हॉटस्पॉट शोधले आहे. याठिकाणी गर्दीचे वेगळे व्यवस्थापन केले जाणार आहे. 

दर्शन रांगेत ५० हजार भाविक
आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सर्व संतांच्या पालख्या आता पंढरी नजीक आल्या आहेत. त्यामुळे पंढरीत विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर दर्शन रांग गेली आहे. सध्या दर्शन रांगेत सुमारे ५० हजार भाविक उभे आहेत. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा अवधी लागत आहे. दर्शन रांगेतील भाविकांना विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे.

प्रदक्षिणा मार्गावर सरकता लोखंडी पुलाची उभारणी
आषाढी यात्रा काळात भाविकांना प्रदक्षिणा पूर्ण करताना अडथळा निर्माण होऊ नये; यासाठी मंदिर समितीने प्रदक्षिणा मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये बारा ते चौदा फूट उंचीचा सरकता लोखंडी उड्डाण उभारला आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय मुख दर्शनाची रांग देखील सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

Local Body Election: मत नाही तर निधी नाही; नेत्यांची गुंडगिरी, मतदारांना धमक्या?

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Gajkesari Rajyog: 12 वर्षांनंतर बनणार गजकेसरी राजयोग; चंद्र-गुरूच्या कृपेने मिळणार भरघोस पैसा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT