Vitthal Rukmini Mandir Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन; प्रक्षाळ पूजेपर्यंत मंदिर राहणार खुले, आषाढी निमित्ताने भाविकांची होणार सोय

Pandharpur News : वारकरी, भाविक पंढरीत येऊन दर्शन घेतात. दहा दिवसांवर आषाढी एकादशी असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागू लागल्या आहे. त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रा आठ दिवसांवर आहे. या अनुषंगाने भाविक पंढपुरात दाखल होऊ लागले आहेत. तर पुढील दिवसात गर्दी अधिक वाढणार असून या काळात भाविकांना तात्काळ दर्शनाचा लाभ मिळावा; यासाठी आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. पुढील वीस दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत मंदिर २४ तास खुले राहणार आहे. 

वर्षातून एकदा येणाऱ्या आषाढी वारीची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी, भाविक पंढरीत येऊन दर्शनाचा लाभ घेत असतात. आता दहा दिवसांवर आषाढी एकादशी असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागू लागल्या आहे. त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले आहे. विठ्ठल भक्ताला चांगले दर्शन घेता यावे; अशी व्यवस्था करण्यात आली असून मंदिर आता २४ तास सुरु ठवण्यात येणार आहे. 

देवाचा पलंग काढून घेत २४ तास दर्शन 

आज सकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत देवाचा पलंग काढण्यात आला. त्यानंतर देवाला लोड देण्यात आला. आज पाहिजे विठुरायाचे विधीवत पूजा केल्यानंतर भाविकांसाठी २४ तास दर्शन सुरू झाले. यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असे ही मानले जाते. या काळात नित्योपचार वगळता विठोबाचे सर्व राजोपचार बंद ठेवले जातात. यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोयीचे होत असते. 

१६ जुलैपर्यंत मंदिर खुले 
आषाढी वारीच्या अगोदर भाविकांची गर्दी वाढतच असते. तर आषाढी एकादशीच्या दिवशी १० ते १२ लाख भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. इतकेच नाही तर आषाढी नंतर देखील दहा- बारा दिवस भाविकांची गर्दी कायम असते. यामुळे आषाढी नंतरच्या १६ जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत २४ तास दर्शन सुरू असणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : पुणे हादरलं! शाळेतील मुलीला फिरण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवलं, ५० वर्षाच्या नराधमाने केले घाणेरडं कृत्य

India's Got Talentच्या मंचावर शहनाज गिलला आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण, रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

SCROLL FOR NEXT