Pandharpur Ashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Ashadhi Wari : सोनं, चांदी अन् देणगी... लाडक्या विठुरायाची श्रीमंती वाढली; आषाढी वारीत कोट्यवधींचं दान!

Pandharpur News : यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्ताने विक्रमी १६ ते १७ लाख भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यात्रा काळात सुमारे ११ लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले आहे

भारत नागणे

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनाची आस भाविकांना लागून असते. दर्शनाची आस घेऊन लाखो भाविक आषाढी निमित्ताने पंढरीत दाखल होत असतात. आलेले भाविक पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेत चरणावर भरभरून दान देतात. यामुळेच सर्वसामान्य आणि गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठोबाची श्रीमंती आता वाढू लागली आहे. यंदाच्या आषाढी वारीत विठोबाच्या तिजोरीत सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम डिङो स्वरूपात देण्यात आली असून यातून तब्बल ८ कोटी ३४ लाख रुपयांचे दान जमा झाले आहे.  

यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्ताने विक्रमी १६ ते १७ लाख भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) आले होते. यात्रा काळात सुमारे ११ लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले आहे. दर्शनाला येणार वारकरी, भाविक विठोबाच्या चरणी देणगी स्वरूपात काही दान करत असतो. त्यानुसार यंदाच्या (Ashadhi Wari) आषाढी यात्रा काळात सर्वाधिक ७७ लाख 6 हजार ६९४ रुपयांची देणगी भाविकांनी देवाच्या चरणावर अर्पण केली. तर १७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तर तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांची चांदीच्या वस्तू दान स्वरुपात मंदिर समितीला मिळाल्या आहेत. 

गतवर्षीपेक्षा २ कोटीने वाढ 

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने यंदा उत्पन्नात देखील मोठी वाढ आहे. यंदा सर्व मिळून साधारण ८ कोटी ३४ लाखाचे दान विठुरायाच्या चरणी आले असून गतवर्षीपेक्षा यंदाच्या आषाढीत सुमारे २ कोटींनी उत्पन्नात वाढ झाली आहे. याशिवाय देवाच्या लाडू प्रसाद विक्रीतून यंदा मंदिर समितीला सुमारे ९८ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे; अशी माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हजारो विद्यार्थी अन् शेकडो पोलीस, रोजगाराचं आश्वासन हवेतच, नागपूरमध्ये लोटांगण मोर्चा भडकला|VIDEO

एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू! आयुष्याचा दोर कापण्यापूर्वी..सुसाईड नोटमुळे गूढ वाढलं; नेमकं घडलं काय?

Shevgyachya Shengachi Bhaji Recipe : फक्त १० मिनिटांत शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी कशी बनवायची?

Jowar Dhirde Recipe: गावरान स्टाईल धिरडं कसं बनवायचं? मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी ऑप्शन

Maharashtra Live News Update: नागपुरात युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक

SCROLL FOR NEXT