Shishupal Patle : पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का; माजी खासदार शिशुपाल पटले यांचा भाजपला रामराम

Bhandara News : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करीत होतो. मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्ष नेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही.
Shishupal Patle
Shishupal PatleSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. त्यांनी २४ जुलैला आपलय सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे. यामुळे आधीच विवंचनेत असलेल्या भाजपला भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गळती सुरू झाली आहे.  

Shishupal Patle
Navapur Heavy Rain : नवापूर शहरात मध्यरात्रीच्या पावसाने दाणादाण; अनेक घरात शिरले आठ फुटापर्यंत पाणी, जनजीवन विस्कळीत VIDEO

भंडारा (Bhandara), गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात शिशुपाल पटले हे पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात. पटले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करीत होतो. मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्ष नेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नासाठी (BJP) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे.

Shishupal Patle
Navapur Nagan Project : अतिवृष्टीमुळे भरडूच्या नागण मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

भाजपचे माजी खासदार असलेले शिशुपाल पटले यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणूकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा भाजपसाठी सुद्धा मोठे धक्का मानला जातो. दरम्यान ते आता कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत मात्र अद्याप स्पष्ट केलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com