pandharpur muncipal council issues notice to 113 property owner know the reason  Saam Digital
महाराष्ट्र

Pandharpur: पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आषाढीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या जीवाला घोर

Ashadhi Wari : आषाढी यात्रे पूर्वी धोकादायक इमारती संबंधीत मालकांनी त्या स्वतःहून खाली घ्याव्यात अन्यथा नगरपालिकेकडून धोकादायक इमारती पाडल्या जातील असा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

भारत नागणे

पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात अनेक मठ, वाडे आणि रहिवाशी इमारती धोकादायक असल्याची गंभीर बाब नगरपालिकेच्या एका पाहणीत समोर आली आहे. शहरातील अशा धोकादायक इमारतींमुळे ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर वारकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे.

राज्यात अनाधिकृत आणि धोकादायक हाेर्डिंगचा मुद्दा गाजत असतानाच दक्षिण काशी असलेल्या पंढरीत धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. आषाढी यात्रेनिमित्ताने नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पंढरपूर शहरातील जून्या इमारती,मठ आणी धर्मशाळेची पहाणी केली. यामध्ये शहरातील तब्बल 113 इमारतीत या धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पालिकेकडून धोकादायक सर्व इमारतींवर सूचना फलक लावण्यात आले आहेत. शिवाय पालिकेने संबंधीत इमारत मालकांना इमारत खाली घेण्या बाबत नोटीसा दिल्या आहेत. आषाढी यात्रे पूर्वी धोकादायक इमारती संबंधीत मालकांनी त्या स्वतःहून खाली घ्याव्यात अन्यथा नगरपालिकेकडून धोकादायक इमारती पाडल्या जातील असा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT