- सचिन जाधव, संजय सूर्यवंशी, अमर घटारे
पुण्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वाढलेली उष्णता यामुळे भाजीपाला आणि फळभाज्या यांचे दर वाढले आहेत. पुणे, नांदेड, अमरावती, सातारा आदी शहरात भाजीपाला, फळभाज्या यांची आवक कमी झाले आहे. परिणामी सर्वच भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे चित्र आहे. तर दूसरीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. (Maharashtra News)
नांदेडमध्ये लसूण वधारला
नांदेड जिल्ह्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी कडक उन्ह तर कधी अवकाळी पाऊस असा खेळ जिल्ह्यात सुरू आहे. वातावरणातील बदलाचा फटका शेती पिकांसह भाजीपाला शेतीला बसत आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. आवक घातल्याने भाजी पाल्याच्या दरात वाढ झाली आहे.
नांदेड येथे लसूण 200 रुपयांवर पाेहचला आहे. इतर पालेभाज्या 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत. त्यामुळे गृहणीचे बजेट कोलमडले आहे.
अमरावतीत पालेभाज्या महागल्या
अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी उष्णता वाढल्यामुळे याचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकाला बसला आहे .त्यामुळे बऱ्याच भाजीपाल्यांच्या भावात वाढ झाली आहे.
सध्या लसणाने घाऊक बाजारात 160 रुपये प्रति किलोचा आकडा पार केला आहे. तर तोच लसूण किरकोळ बाजारात 200 रुपये ते 250 रुपये प्रति किलो भावाने विकला जात आहे. त्यामुळे ग्राहकाच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अवकाळी पावसाचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे.त्यामुळे आता पुन्हा भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ बाजारात बटाटे, भेंडी, कोबी, टोमॅटोचे भाव वाढले आहेत. यामध्ये बटाटे 30 ते 40 रुपये प्रति किलो, टोमॅटो 30 रुपये,भेंडी 60 रुपये किलोने विक्री सुरू आहे. मेथी, शेपू, चुका ,पालक दहा ते वीस रुपये पर्यंत जुडी मिळत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.