Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Pandharpur Vitthal Rukmini Mandir News: दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीन दिले आहे. आज मंदिर समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत नागणे

पंढरपुर, ता. १८ मे २०२४

पंढरपुरच्या विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी. गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. आज मंदिर समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरात संवर्धन आणि सुशुभिकरणाचे काम सुरू असल्याने 15 मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता आषाढी वारीची चाहूल लागल्याने मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर येत्या दोन जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

15 मार्चपासून ते संवर्धन आणि शिशुभकरणाच्या कामासाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता मंदिराचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित 30 टक्के कामासाठी ही अवधी लागणार आहे. मात्र आता आषाढी वारीनिमित्त मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहेच तसेच आषाढी यात्रेच्या निमित्ताने 7 जुलै पासून देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.‌

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपरफुटीचा देखावा ठरतोय लक्षवेधी; कल्याणच्या ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी

Maharashtra News Live Update: दीड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन, वानवडीत घरामध्ये आगीची घटना

सर्कलवरचा हत्ती दाखवा अन् बक्षीस मिळवा! चमकोगिरीमुळे महत्त्वाचा लँडमार्कच अदृश्य

Ratnagiri Temple : ४०० वर्ष जुनं गणपती मंदिर अन् स्वच्छ समुद्रकिनारा, रत्नागिरीतील 'या' ठिकाणाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT