Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Pune Breaking News: शहरातील कोंढवा परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना
Pune Crime NewsSaam TV
Published On

सचिन जाधव, पुणे|ता. १८मे २०२४

लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडताच पुणे शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना समोर आली आहे. शहरातील कोंढवा परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील कोंढवा भागात डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या हत्या झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरातील संत गाडगेबाबा शाळेसमोर पारशी मैदानात एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना
Pune News: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे मुंबई धावणारी डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस ६ दिवस रद्द

दरम्यान, पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी निर्घृण हत्येची घटना समोर आली आहे. याआधी शहरातील येरवडा,हडपसर आणि कोथरूड परिसरात हत्येच्या घटना घडल्या होत्या. या खुनांच्या मालिकांनंतर शहरातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होत असून गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा धाक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना
Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com