Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

Shirur Loksabha Election 2024: मुरलीधर मोहोळ, संजोग वाघेरे यांच्यानंतर आता शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे यांचेही पिंपरी चिंचवड परिसरात अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
 Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर
Shirur Loksabha Election 2024: Saamtv

पिंपरी चिंचवड, ता. १८ मे २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा सुरू आहे. लोकसभेच्या तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून विजयी गुलाल कोण उधळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र त्याआधीच अनेक ठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकू लागलेत. मुरलीधर मोहोळ, संजोग वाघेरे यांच्यानंतर आता शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे यांचेही पिंपरी चिंचवड परिसरात अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

पुणे, मावळ, शिरुरसह ११ लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले. शिरुरमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्यासमोर महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान होते.

१३ मे रोजी शिरुर लोकसभेसाठी मतदान पार पडले. मतदानानंतर आता विजयाचा गुलाल कोण उधळणार? अमोल कोल्हे गड राखणार की आढळराव पाटील धक्का देणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच पिंपरी चिंचवड परिसरात अमोल कोल्हे यांच्या विजयी अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

 Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर
Manoj jarange Patil: 'दिलेला त्रास विसरु नका, मतांमधून ताकद दाखवा', जरांगे पाटलांचे आवाहन; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा!

पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उप शहर संघटिका रूपाली परशुराम आल्हाट यांनी अमोल कोल्हे यांच्या विजयाचे होर्डिंग्स लावले आहेत. अमोल कोल्हे यांचे शिरूर लोकसभा क्षेत्रातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. दरम्यान, विजयाचे बॅनर्स झळकले तरी मतदार राजा कोणाला मत देणार? याबाबत ४ जूनची वाट पाहावी लागणार आहे.

 Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर
Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com