Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Pune Cyber Fraud News: हॉटेल व्यावसायिकाने तब्बल ४३ लाख रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कॅम्प परिसरातील ५२ वर्षीय व्यावसायिकाने लष्कर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून बक्कळ पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा
Cyber FraudSaam tv

सचिन जाधव, पुणे|ता. १८ मे २०२४

पुणे शहरात सायबर क्राईचे गुन्हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर ट्रेडिंग करून भरपूर पैसे कमावण्याच्या नादात एका हॉटेल व्यावसायिकाने तब्बल ४३ लाख रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कॅम्प परिसरातील ५२ वर्षीय व्यावसायिकाने लष्कर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने व्हॉट्सअपवरून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. फिर्यादी यांनी आमिषाला बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिला.

त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सअप जॉइन करायला सांगितले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादींनी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकूण ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून बक्कळ पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा
Chhatrapati Sambhajinagar: गर्भातच कळ्या खुडायचे, शेतात पुरायचे, छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंगनिदान करणारे रॅकेट उध्वस्त; १० अटकेत

यानंतर त्यांना ५ लाख रुपये मोबदला देण्यात आला. फायदा होत आहे, असा विश्वास बसल्याने त्यांनी पैशांची गुंतवणूक सुरू ठेवली. काही काळानंतर मात्र त्यांना ते पैसे काढता येत नव्हते. त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला, तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरायला सांगितले. परंतु कोणतेही पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे युवकाच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून बक्कळ पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा
Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com