Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब

Devendra Fadnavis Speech : शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इंडिया' आघाडीवर जोरदार टीका केली. भाजपच्या काळात मुंबईत झालेल्या विकासकामांचा पाढा वाचत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.
Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब
Devendra Fadnavis Speechsaam Tv

मुंबई: भाजपने मुंबई आणि महाराष्ट्राचे वैभव मिटवलंय. मुंबईतील विकासकामे रोखल्याची टीका उद्धव ठाकरेंकडून प्रत्येक भाषणात केली जाते. या टीकेला देवेंद्र फडणवीस आज जोरदार उत्तर देताना त्यांनी 'इंडिया' आघाडीकडे कामांचा हिशोब मागितलाय. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी मुंबईसाठी काय कामे केली याचा जाब फडणवीस यांनी विचारला.

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या प्रचारात मुंबई,मराठी माणूस, मुंबई, गुजरात उद्योगधंदे हे मुद्दे गाजले. भाजपने मुंबईतील उद्योगधंदे गुजरात नेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव भाजपच्या नेत्यांनी ओरबाडून काढल्याचा आरोप उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करत असतात. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषणावरून खडेबोल सुनावलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तयार झालेल्या महायुतीने मुंबईचा चेहरा बदललाय. मुंबईत मोठं परिवर्तन घडवल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. भाजपने मुंबईत तयार केलेला अटल सेतू पूल, कोस्ट रोड प्रोजेक्ट,मुंबई मेट्रो, मुंबईमधील झोपडपट्टी धारकांना मिळणारे घरे, धारावी पुर्नविकास, हे कामे आम्ही सांगतो. पण इंडिया आघाडीकडे एकही असं प्रोजेक्ट नाही जे त्यांनी केले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

निवडणूक आल्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांकडून विरोधाचे जुमले बांधतात. राज्यातील सरकारने मुंबईतील उद्योग धंदे पळवून लावल्याचा आरोप उद्धव ठाकरेंकडून केला जातो. त्याला इतर देताना फडणीवस म्हणाले मी मुख्यमंत्री होण्याआधी विकासाच्या आणि उद्योगांच्या बाबतीत गुजरात देशातील इतर राज्याच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर होता. पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा महाराष्ट्र एक नंबर होता, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

कोरोना काळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकारने मुंबईत प्रेतांच्या टाळूवरील तुप खाण्याचं काम केल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.उद्धव ठाकरेंच्या सरकारने खिचडी घोटाळा,रेमडिसिव्हरचा घोटाळा केला होता. डेडबॉडी बॅग, कफन चोर आणि खिचडी चोरांमुळे प्रेतांच्या टाळूवरील लोणी कसं खाल्लं जातं हे कळलं असा टोला फडणवीसांनी मारला. पंतप्रधान मोदी जेव्हा कोरोना काळाती नागरिकांना मदत करत होते तेव्हा हे घोटाळा करत होते,यामुळे आपल्याला कुठेतरी जाब विचारावा लागेल, असं फडणवीस म्हणाले.

Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब
PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com