PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Modi In Shivaji Park : राज्यात येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. यापूर्वी महायुतीने शिवाजी पार्कवरील सांगता सभेत विरोधकांवर हल्लाबोल केला. महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
PM Modi In Shivaji Park

राज्यात येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या शिवाजीपार्कावर महायुतीची सांगता सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला टार्गेट केलं. सभेला आलेल्या नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला.

भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेक देश स्वतंत्र झालेत,पण ते देश भारतापेक्षा पुढे निघून गेलेत. आपला देश इतराच्या तुलनेत कोणाशी कमी नव्हता, परंतु ज्या लोकांचे सरकार देशात होते त्यांनी देशातील लोकांच्या सामर्थ्यांवर विश्वास ठेवला नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघात चढवला.

देश स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांच्या म्हणण्यानुसार जर काँग्रेसला भंग केले असते तर भारत आज साधरण ५ दशकं पुढे असता. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व व्यवस्थांचे काँग्रेसकरण झाल्यानं देशाची ५ दशकं वाया गेल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशातील अर्थव्यवस्था ६ व्या क्रमांकावर होती. त्यानंतर जेव्हा २०१४ मध्ये भाजपच्या हाती सत्ता आली तेव्हा काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था थेट ११ व्या नंबरवर आणली होती.

जेव्हा जनतेने प्रधान सेवकाच्या हाती सत्ता दिली तेव्हा फक्त १० वर्षात देशाची अर्थव्यवस्था ५ व्या स्थानी आणली. आज भारतात आणि मुंबईत रेकॉर्ड अशी गुंतवणूक केली जात असल्याचा दावा मोदींनी यावेळी केला. जनता जेव्हा तिसऱ्यांदा सत्ता आमच्या हाती देईल तेव्हा आपला देश तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालेली असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. मुंबई स्वप्नांची नगरी आहे, या नगरीत मी २०४७ चं स्वप्न घेऊन आलोय. भारताला विकसीत देश करण्याचं संकल्प असून त्यात मुंबईची मोठी भूमिका आहे.मुंबईचे लोकांना गतीची किंमत समजत असल्याचं ही मोदी म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com