Ratnagiri Temple : ४०० वर्ष जुनं गणपती मंदिर अन् स्वच्छ समुद्रकिनारा, रत्नागिरीतील 'या' ठिकाणाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

Shreya Maskar

कोकण-रत्नागिरी

गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटेसे किनारपट्टीवरील शहर आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते.

Konkan-Ratnagiri | google

गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे हे येथील ४०० वर्षे जुन्या 'स्वयंभू' गणपती मंदिरासाठी आणि कोकण किनारपट्टीवरील स्वच्छ व निसर्गरम्य पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Ganapatipule Temple | google

स्वयंभू मूर्ती

गणपतीपुळे मंदिरात ४०० वर्षे जुन्या स्वयंभू गणेश मूर्ती आहे. येथे शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवता येते. परदेशी पर्यटकही येथे आवर्जून येतात.

Swayambhu Murthy | google

गणपतीपुळे बीच

गणपतीपुळे मंदिर गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आहे. येथे पांढरी वाळू आणि स्वच्छ किनारे पाहायला मिळतात. फोटोशूटसाठी हे भन्नाट लोकेशन आहे.

Ganapatipule Beach | google

वॉटर स्पोर्ट्स

गणपतीपुळे बीचवर गेल्यावर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. यात जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, पॅरासेलिंग आणि मोटरबोट राईड यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

Water sports | google

घोडेस्वारी

तुम्ही येथे आपल्या कुटुंबासोबत जा. समुद्रकिनाऱ्यावरील सपाट आणि वालुकामय पट्ट्यावर उंट आणि घोडेस्वारीचा आनंद घेता येतो.

horse riding | google

कसं जाल?

मुंबईहून रत्नागिरीपर्यंत ट्रेनने प्रवास करा. रत्नागिरी रेल्वे स्थानक ते गणपतीपुळे हे ३० किमीचे अंतर आहे. तुम्ही येथे रिक्षाने जाऊ शकता.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : फक्त २ दिवसांत करा महाराष्ट्राची भन्नाट सफर, 'ही' सुंदर ठिकाणं नक्की पाहा!

Maharashtra Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...