Pandharpur kartiki ekadashi  Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur Kartiki Ekadashi: पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीवर दुष्काळाचे सावट; आर्थिक उलाढाल निम्म्यावर आल्याने व्यापारी संकटात

Kartiki Ekadashi 2023: पंढरपूर नगरीमध्ये 14 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये कार्तिकी यात्रा पार पडली. कार्तिक शुद्ध दशमीला विविध राज्यांमधून सात लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.

भारत नागणे

Pandharpur Kartiki Ekadashi News:

पंढरपूर नगरीमध्ये 14 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये कार्तिकी यात्रा पार पडली. कार्तिक शुद्ध दशमीला विविध राज्यांमधून सात लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. मात्र यंदा कार्तिकी यात्रेवर दुष्काळ, महागाई आणि आंदोलनाचे सावट दिसून आले. गतवर्षी पेक्षा यंदाच्या कार्तिकी यात्रेत निम्यानेच उलाढाल झाल्याने व्यापारी आणि दुकानदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पंढरपूर नगरीमध्ये (Pandharpur) कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह विविध राज्यातून लाखो भाविक या यात्रेसाठी पंढरपुरात येत असतात. आषाढी आणि कार्तिकी या प्रमुख दोन यात्रा मध्ये दरवर्षी कोट्यावधी रूपयांची पंढरपूरच्या बाजारात आर्थिक उलाढाल होते. यंदा मात्र कार्तिकी यात्रेवर दुष्काळ आणि आंदोलनाचे सावट दिसून आले .

तसेच कोकण, मुंबई व कर्नाटकमधून येणाऱ्या भाविकांची संख्या यंदा काही प्रमाणात घटल्याने त्याचा बाजारातील उलाढालीवर परिणाम झाल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. यात्राकाळात प्रामुख्याने प्रसाद, पितळी मूर्ती, देवांचे‌ फोटो, तुळशी माळा,घोंगडी यासह इतर साहित्यांची यात्रेत मोठी विक्री होते. त्यातून मागील वर्षी सुमारे पाचशे कोटींची उलाढाल झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदा मात्र अडीचशे ते तीन कोटींची उलाढाल झाली. यंदाच्या कार्तिकी यात्रेत निम्यानेच उलाढाल झाल्याने पंढरपुरातील व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. दरम्यान, यंदा कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) महापूजेवरुन राजकारण रंगल्याचे पाहायला मिळाले होते.

एकीकडे मराठा आंदोलकांनी शासकीय महापुजेला विरोध दर्शवला होता तर दुसरीकडे राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने पुजा कोण करणार? असा पेच मंदिर समितीसमोर होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT