अक्षय बडवे
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराच्या मुद्द्यानंतर आता पुण्यात नामांतराचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पुण्यातील महम्मदवाडीचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. महम्मदवाडीचे नाव बदलून ते महादेववाडी करा अशी मागणी केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे याबाबत मागणी केली आहे. हडपसर भागातील महम्मदवाडी गावाचे नाव बदलण्याची भरत गोगावले यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गोगावले यांच्या मागणीची दखल घेत याबाबत कागदपत्रांची तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याचे महापालिकेला आदेशही देण्यात आले आहेत.
नामांतरासाठी गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. महम्मदवाडीचे नामकरण महादेववाडी असे करण्यात यावे या बाबत तेथील जनतेतून सतत मागणी होत आहे. तसे निवेदनही त्यांनी दिलेले आहे. तेथील जनतेच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन पुणे शहरामधील हडपसर भागाअंतर्गत महम्मदवाडीचे नामकरण महादेववाडी असे नामकरण करावे ही विंनती, असं या पत्रात लिहिलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा मुद्दा तापलेला होता. औरंगबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
यासह अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यादेवीनगर' करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
अशात आता नामांतराचा हा मुद्दा पु्ण्यातही उपस्थित झाला आहे. त्यामुळे पुण्यातील (Pune) महम्मदवाडीचे नाव बदलून ते महादेववाडी होणार का? स्थानिकांसह भरत गोगावले यांची मागणी सरकार मान्य करणार का? याकडे पुणेकरांसह राज्यचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.