Pandharpur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: विठुरायाच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला, भरधाव कारला अपघात; २ भाविकांचा जागीच मृत्यू

Pandharpur Accident: पंढरपूरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. कारमधून काही भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले.

Priya More
  • पंढरपूरला जाताना भाविकांच्या कारला अपघात

  • सांगोला जुनोनीजवळ घडली अपघाताची घटना

  • विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या २ भाविकांचा मृत्यू

भरत नागणे, पंढरपूर

पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. सांगोल्याच्या जुनोनीजवळ भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन भाविकांचा जागाची मृत्यू झाला तर ३ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासाच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ ही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला.‌ रेखा चिंतामणी भोसले आणि संदीप चिंतामणी भोसले या मायलेकाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तर तीन गंभीर जखमी आहेत.

हे सर्व भाविक सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे‌. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेले भाविकांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, बीडमध्ये भीषण अपघात झाला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता त्याने जागीच प्राण सोडले. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. माजलगाव-सादोळा रस्त्यावर ही घटना घडली. सध्या पोलिस या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT