hutatma chowk Panch Batti Palghar रुपेश पाटील
महाराष्ट्र

Palghar: हुतात्म्यांना पालघरवासीयांकडून आदरांजली; काय आहे १४ ऑगस्ट १९४२ चा इतिहास?

14 August 1942 Hutatma Diwas Palghar: १४ ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर: १४ ऑगस्ट १९४२ रोजी 'चले जाओ' चळवळीत पालघर (Palghar) तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना (Freedom Fighters) हौतात्म्य प्राप्त झाले होते. १४ ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने आज पालघर शहरातील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्तंभ (पाचबत्ती) येथे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येत एकत्र येत या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. (Palghar Latest News)

हे देखील पाहा -

१४ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरोधात चले जाओ आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात पालघरमधील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येथील काशिनाथ हरी पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून पालघर शहरातील बाजारपेठेत पूर्णपणे बंद पाळण्यात येतो. (hutatma chowk Panch Batti Palghar)

याप्रसंगी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसह, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, पालघरच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस दल, अग्निशमन दल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी हुतात्मा दौडही आयोजित करण्यात आली होती.

पालघरचा इतिहास (History of Palghar)

1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा बनला. जव्हार, वसई आणि पालघरला ऐतिहासिक वारसा आहे. वसई (तेव्हा बसीन म्हणून ओळखले जायचे) पोर्तुगीज साम्राज्याच्या अंतर्गत होते. चिमाजी अप्पा, मराठा सैन्य सेनापती नंतर पोर्तुगीजांकडून वसई किल्ला काबीज केला आणि वसईवर मराठा ध्वज फडकवला. 1942 मधील चले जाओ चळवळीत पालघर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.

14 ऑगस्ट 1942 रोजी पालघरमध्ये इंग्रजांविरुद्ध उठाव झाला, त्यात काशिनाथ हरी पगधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र महादेव चुरी आणि गोविंद सुकुर मोरे यांना हौतात्म्य झाले. पालघरचे मुख्य मंडळ या शहिदांच्या सन्मानार्थ “पाचबत्ती” (मराठीत ‘पाच दिवे’) म्हणून ओळखले जाते. 14 ऑगस्ट पालघरमध्ये "हुतात्मा दिन" म्हणून घोषित करण्यात आला आहे. यादिवशी पालघरचे नागरित पाचबत्ती चौफुलीवर जमतात आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या पाच हुतात्म्यांनी आदरांजली वाहतात.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

SCROLL FOR NEXT