धरणगाव (जळगाव) : शिंदे गटात सहभागी झालेले गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. यानंतर जळगावात (Jalgaon) आल्यावर धरणगाव शहरातील महापुरूषांच्या स्मारकाला माल्यार्पण केले होते. मात्र शिवसेनेने (Shiv Sena) आज आक्रमक होत महापुरूषांच्या त्या स्मारकांना दूग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले. (Jalgaon Shiv Sena News Gulabrao Patil)
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिंदे गटात सामिल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात शिंदे गट आणि (BJP) भाजपचे सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. यात जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. शनिवारी (१३ ऑगस्ट) कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि धरणगाव (Dharangaon) तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून धरणगाव शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते.
शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी
कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी ज्या स्मारकांना माल्यार्पण करण्यात आले होते. यानंतर आज (१४ ऑगस्ट) शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारंकांना दुग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले. यावेळी शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.