Pachora: रक्षाबंधनासाठी आलेल्या विवाहितेची माहेरीच आत्‍महत्‍या; विवाहाला झाले तीनच महिने

रक्षाबंधनासाठी आलेल्या विवाहितेची माहेरीच आत्‍महत्‍या; विवाहाला झाले तीनच महिने
Jalgaon Suicide Case
Jalgaon Suicide CaseSaam tv
Published On

पाचोरा (जळगाव) : शेवाळे (ता. पाचोरा) येथील रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १३) घडली. यामुळे सारे गाव सुन्न झाले आहे. विवाहानंतर (Marriage) अवघ्या तीन महिन्यात माहेरी येऊन गळफास घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय का घेतला असावा? याचा पोलिस (Police) तपास करीत आहेत. (Jalgaon News Suicide Case)

Jalgaon Suicide Case
चोपड्यात ‘सैराट’..बहिणीचा गळा आवळून, प्रियकराची गोळी झाडून हत्या

शेवाळे येथील (Pachora) नानू हादगे यांची मुलगी उमा हिचा विवाह गेल्या तीन महिन्यापूर्वी मे २०२२ मध्ये जळगाव येथील प्रेमनाथ उमप यांचा मुलगा सनी याच्याशी झाला होता. विवाहानंतर उमा ही दोन, तीन वेळा माहेरी आली. अत्यंत आनंदाने सासरी गेली होती. मात्र रक्षाबंधनानिमित्त शुक्रवारी (ता. १२) उमा वडिलांसोबत माहेरी आली व रात्री गावातीलच शीला गायकवाड या मावशीकडे झोपण्यासाठी गेली. मावशीकडे रात्री बराच वेळ तिने गप्पा मारल्या. शनिवारी (ता १३) सकाळी उमा आपल्या घरी आली व मी आंघोळीला जाते असे सांगून स्नानगृहाकडे निघाली.

उमाला पाहून‌ वडिलांचा आक्रोश

बराच वेळ झाला तिच्या वडिलांनाही अंघोळ करून बाहेर जायचे असल्याने ते स्नानगृहाकडे गेले. तेव्हा उमा तेथे दिसली नाही म्हणून त्यांनी स्वयंपाक घरात डोकावून पाहिले असता उमा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्या वेळी त्यांनी हंबरडा फोडला. त्यामुळे शेजारी जमा झाले. त्यांनी उमाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले व शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलिस कर्मचारी राकेश खोंडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com