चोपड्यात ‘सैराट’..बहिणीचा गळा आवळून, प्रियकराची गोळी झाडून हत्या

चोपड्यात ‘सैराट’..मुलीचा गळा आवळून, प्रियकराची गोळी झाडून हत्या
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

चोपडा (जळगाव) : प्रेमप्रकरणातून सख्या भावाने बहिणीची गळा आवळून तर तिच्या प्रियकराची गोळी झाडून हत्या (Crime) केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. पुन्हा ‘सैराट’ची प्रचिती देणाऱ्या या ‘ऑनर किलिंग’ घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सख्खे व चुलत अशा पाच भावंडांकडून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यातील तरुणीचा १७ वर्षीय अल्पवयीन भाऊ स्वतः गावठी कट्ट्यासह शहर (Police) पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यातील पाचही संशयिताना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jalgaon Chopda Crime News)

Jalgaon Crime News
Beed: मेटे साहेबांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे; कार्यकर्त्यांची मागणी

जिल्ह्याला (Jalgaon) हादरून टाकणारी ही घटना शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वराड रस्त्यावरील नाल्यात शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली. यात प्रेमप्रकरणातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. पुंडलिकनगर, चोपडा), राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपुरा, चोपडा) यांची हत्या (Crime News) करण्यात आली. राकेश राजपूत हा वर्षा कोळी हिच्या शहरातील पुंडलीकनगर येथील घरी गेला होता. तिथे राकेश व वर्षा हिच्या भावंडांमध्ये वाद झाला. राकेश वारंवार घरी येतो, यामुळे आपल्या घराची समाजात बदनामी होते, या रागातून राकेश व वर्षाला घेऊन करण ऊर्फ कुणाल समाधान कोळी (वय १७, पुंडलिकनगर, चोपडा), नीलेश समाधान कोळी (वय १५, पुंडलिकनगर,चोपडा), भरत संजय रायसिंग (२१, रा सुंदरगढी, चोपडा), तुषार आनंदा कोळी (२३, रा. माचले, ता. चोपडा), बंटी ऊर्फ जय शांताराम कोळी (१९, रा. बोरोलेनगर, चोपडा) यांनी मोटारसायकलवरून शहरातील चिंच चौकाकडून जुन्या वराड रस्त्याकडे नेले. तिथे पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर राकेशने रस्त्याकडेला असलेल्या नाल्याकडे पळ काढला.

स्‍वतः पोलिसात झाला हजर

राकेशला गाठत संशयित कुणाल कोळी व तुषार कोळी याने गावठी कट्ट्यातून राकेशवर गोळी झाडत हत्या केली. तर वर्षा हिचा रुमालाने गळफास देत खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली. यानंतर कुणाल कोळी याने स्वतः शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत तपासाचे चक्र फिरवली. त्यानंतर अवघ्या १२ तासांत घटनेतील नीलेश कोळी, भरत रायसिंग, तुषार कोळी, बंटी ऊर्फ जय कोळी यांना ताब्यात घेतले. वरील पाचही जणांवर कुणाल कोळी याच्या माहितीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com