Rasta Roko Aandolan Saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko Aandolan : जव्हार- मोखाडा- नाशिक महामार्गावर चक्का जाम; पेसा भरतीसंदर्भात आंदोलकांना पाठींबा

Palghar News : सरकारने पेसा भरती लवकरात लवकर सुरू करावी, राज्य पेसा कक्षात किमान ५० टक्के आदिवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

पालघर : नाशिक येथे सुरू असलेल्या पेसा भरती संदर्भातील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज पालघर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सहभाग घेत ठीक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनला सुरुवात झाली आहे. दरम्यान जव्हार- मोखाडा- नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

सरकारने पेसा भरती लवकरात लवकर सुरू करावी, राज्य पेसा कक्षात किमान ५० टक्के आदिवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीत पेसाचा पैसा कुठे खर्च केला यांची चौकशी करावी. नवीन पेसा गावांची निर्मिती गतिमान करावी, या सारख्या अनेक मागण्यासाठी आज चक्का जाम (Rasta Roko) आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलकांनी बसही आडविल्या 

पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा तालुक्यात चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलनकर्त्यांनी जव्हार व मोखाडा तालुक्यातील डाहाणू - जव्हार- मोखाडा- नाशिक (Nashik) महामार्गावर चक्का जाम आंदोलनला सुरवात केली आहे. मोखाडा तालुक्यातील बिरसा मुंडा चौक तर जव्हार बसस्थानकातील बस देखील अडवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Navi Mumbai Result: नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकले? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Success Story: फुटपाथवर आईने कष्ट केले, पोरानं आज वर्दी चढवली! नोकरी लागताच गोपाळ आईपुढे नतमस्तक; काळजाला भिडणारा व्हिडिओ

Loneliness Health Impact: एकटेपणामुळे तुम्हाला होऊ शकतात इतके आजार; पाहा कशी दिसून येतात याची लक्षणं

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं महागलं, वाचा २२k-२४k ची लेटेस्ट किंमत...

SCROLL FOR NEXT