Manasvi Choudhary
पाठीवरच्या चरबीमुळे अनेक महिला व मुली त्रस्त असतात. अनेकदा पाठीवरच्या वाढलेल्या चरबीमुळे साडी, फिटिंगचे कपडे परिधान करतात संकोच वाटते.
पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी महिला जीममध्ये जाऊन व्यायाम करतात. मात्र तुम्हाला माहितीये का घरीच सोपे व्यायाम प्रकार केल्याने तुम्ही पाठीवरची चरबी कमी करू शकता.
कॅट - काऊ योगा प्रकार हा गुडघे जमिनीला टेकून हातांवर केला जातो. पाठ खाली करून मान वरच्या बाजूला झोकून करा.
पोटावर पालथे झोपून सुपरमॅन सारखे दोन्ही पाय आणि हात हवेत वर उचला यामुळे शरीराच्या स्नायूंची हालचाल होते.
कोब्रा पोजमध्ये तुम्हाला पोटावर झोपून हाताच्या सहाय्याने शरीराचा भाग वर उचलायचा आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.