Shruti Vilas Kadam
1 कप साबूत उडीद डाळ, ¼ कप राजमा, 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 2 चमचे बटर, 2 चमचे क्रीम, मीठ, तिखट आणि गरम मसाला घ्या.
उडीद डाळ आणि राजमा स्वच्छ धुवून किमान 8 ते 10 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यामुळे ते लवकर शिजतात.
भिजवलेली डाळ व राजमा कुकरमध्ये मीठ आणि पुरेसे पाणी घालून 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत मऊ शिजवून घ्या.
कढईत बटर गरम करून त्यात कांदा परता. कांदा सोनेरी झाल्यावर आले-लसूण पेस्ट घाला. नंतर टोमॅटो घालून चांगले मऊ होईपर्यंत शिजवा.
तयार मसाल्यात लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला घाला. त्यानंतर शिजवलेली डाळ आणि राजमा मिसळून चांगले ढवळा.
डाळ मखनीची खरी चव मंद आचेवर शिजवल्याने येते. 20 ते 30 मिनिटे सतत ढवळत शिजवा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला.
शेवटी फ्रेश क्रीम आणि थोडे बटर घाला. वरून कोथिंबीर सजवून गरमागरम डाळ मखनी नान, रोटी किंवा जिरा राईसबरोबर सर्व्ह करा.